पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांचे पती शैलश टिळक यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल, असं मुक्ता टिळक यांच्या समर्थकांना वाटत होते. कसबा पेठ पोटनिवडणुक लढवणार असल्याचं शैलेश टिळकांनी बोलूनही दाखवले होते. मात्र शैलेश टिळक यांना भाजपने डावलून स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यावर शैलेश टिळक नाराजही झाले. आज हेमंत रासने यांनी शैलेश टिळकांची भेट घेतली.
“संताप वाटतो, आव्हाड तुम्हाला ऐकतांना..” त्या वक्तव्यावरून चित्रा वाघ आव्हाडांवर भडकल्या
कसबा पेठ विधान सभा मतदारसंघासाठी हेमंत रासने आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत रासने यांनी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची केसरीवाडा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. हेमंत रासने यांनी मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी शैलेश टिळक यांनी हेमंत रासने यांना आगामी निवडणुकीकरीता शुभेच्छा दिल्या.
हेमंत रासने यांना कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शैलेश टिळकांनी नाराज व्यक्त केली. कसबा पेठ मतदार संघात ब्राम्हणांचा वचर्स्व राहिलं आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांना उमेदवारी न दिल्याने ब्राम्हण वर्ग नाराज झाला आहे. तसेच मुक्ता टिळक यांचं राहिलेलं काम करण्याची इच्छा होती. याची खंत वाटणार आहे. परंतु पक्षांनी दिलेला आदेश आम्हाला मान्य आहे. असं शैलेश टिळकांनी म्हटलं आहे.
मामा भाच्याला अडचणीत आणण्यासाठी मोठा षडयंत्र, सत्यजीत तांबेंनी सगळं पितळ उघड पाडलं
दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी देखील मैदानात उतरली आहे. काल काॅंग्रेसकडून या पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तेब झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु महाविकास आघाडीकडून अदयापही आपला या निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही.
Read also
- “नाना भाऊ काॅंग्रेसमध्ये राहुन भाजपचं उघडपणे काम करताहेत,” राष्ट्रवादीचा नाना पटोलेंवर आरोप
- “ठाकरेंच्या रिफायनरी विरोधामुळे कोकणाने 1 लाखांचा रोजगार गमावला,” फडणविसांचा गंभीर आरोप
- “भाजपने अंधेरीत उमेदपणा दाखवला, तोच आता आघाडीने दाखवावा”, पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी राज ठाकरेंचं पत्र
- “त्यांनी आता साधा नागपुरचा आमदार तरी निवडून आणून दाखवावा”, एकनाथ खडसेंनी डिवचलं
- “नाना पटोले ते भाजप, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे.;” सत्यजीत तांबें कुणाबद्दल काय काय म्हणाले