जळगाव : नागपुर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने पाठिंबा दिलेले नागो गाणार यांचा पराभव झाला. त्यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबोले यांनी मोठ्या फरकांवर विजय मिळवला. नागपुर शिक्षक मतदार संघात सुरूवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले आघाडीवर राहिले. त्यांना आतापर्यंत 16500 मत मिळवून विजयी झालेत. तर त्यांच्याविरोधात विद्यमान आमदार नागो गाणार यांना फक्त 6366 मत मिळालीत. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
आपच्या विविध शाखा अन् जनसंपर्क कार्यालयाचे हरीभाऊ राठोड यांच्या हस्ते उद्घाटन
जनतेने फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला नाही. नागपुरची जागा मुद्दाम मतदारांनी पाडली. कारण पदवीधरांचा फडणवीस यांच्यावर विश्वास नव्हता. फडणवीस, गडकरी यांच्या बालेकिल्ल्यात विशेषत: संघाच्या बालेकिल्ल्यात भाजपने सपाटून मार खाल्ला आहे. खडसे त्यांच्या गावात एक सरपंच निवडून आणू शकत नाहीत. असं मला म्हणत होते. आता माझा फडणवीस यांना सवाल आहे. त्यांनी साधा नागपुरचा आमदार तरी निवडून आणून दाखवावा. असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
“कसब्याच्या उमेदवारीवरून शैलश टिळक भाजपवर नाराज, खंतही व्यक्त करून दाखविली”
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांना जुनी पेन्शन देता येणार नाही असं म्हटलं होतं. त्याचा उलट परिणाम भाजपवर झालेला दिसून आला. औरंगाबाद निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर नो पेन्शन नो वोट असा उल्लेख असलेल्या मतपत्रिका दिसून आल्या. त्यामुळे पेन्शनं या निवडणुकीत भाजपचं टेन्शन वाढवलेलं दिसून आलं.
Read also
- “नाना पटोले ते भाजप, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे.;” सत्यजीत तांबें कुणाबद्दल काय काय म्हणाले
- “संताप वाटतो, आव्हाड तुम्हाला ऐकतांना..” त्या वक्तव्यावरून चित्रा वाघ आव्हाडांवर भडकल्या
- “चुकीचे फार्म पाठवून सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसनेच घात केला..;” निवडणुकीच्या आधी सगळी स्कि्प्ट लिहिली गेली
- मामा भाच्याला अडचणीत आणण्यासाठी मोठा षडयंत्र, सत्यजीत तांबेंनी सगळं पितळ उघड पाडलं
- निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शुंभागी पाटलांची नवी ईनिंग, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘शिवसेनेत’ प्रवेश