पुणे : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड च्या वतीने 2 फेब्रुवारी रोजी 4 शाखा आणि संतोष इंगळे यांच्या संत तुकाराम नगर येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आपचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड प्रभारी मा हरीभाऊ राठोड यांच्या हस्ते आपचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत, कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष अनुप शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
पोटनिवडणुकांसाठी भाजप अन् आघाडीकडून उमेदवार घोषीत…! आता थेट लढत होणार ?
प्रभारी हरिभाऊ राठोड यांच्या नियोजित पिंपरी चिंचवड दौऱ्यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष ब्रम्हानंद जाधव यांनी सांगितले. यावेळी आपच्या लता भोसले, सोनाली झोळ, अभिजित सूर्यवंशी, शुभम यादव, अशोक तनपुरे यांच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संत तुकाराम नगर येथे आपच्या पिंपरी विधानसभा प्रचारप्रमुख संतोष इंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये पुरेसा शुद्ध पाणी पुरवठा,जन आरोग्य सुविधा,सुरक्षित रस्ते,सामाजिक सुरक्षा,प्रवासी वाहतूक,वीज वितरण ईई अनेक नागरी समस्या आहेत.चिंचवड विधानसभा किंवा शहरातील इतर विधान सभा मतदार संघातील राजकारण गावकी भावकी नाती गोती यावर आधारित आहे. आम्ही राष्ट्रीय स्तरावर ग्लोबल व आधुनिक राजकीय संस्कृती निर्माण करत आहोत. पिंपरी चिंचवड शहराचे राजकारण,समाजकारण संविधानिक चौकटीत चालले पाहिजे. विविध भारती अशी ओळख असलेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघातील प्रश्न हे स्मार्ट सिटीच्या रुपरेषेने सोडवले पाहिजेत असे हरिभाऊ राठोड यांनी नमूद केले.
Read also
- “कसब्याच्या उमेदवारीवरून शैलश टिळक भाजपवर नाराज, खंतही व्यक्त करून दाखविली”
- चिंचवडमध्ये राहुल कलाटे विरूद्ध अश्विनी जगताप, बिनविरोध की थेट लढत ? अंतिम निर्णय महत्त्वाचा
- “मुघलप्रेमी, मुंबईचा गॅंगवॉर, जित्या ची खोड,” त्या विधानानंतर आव्हाड अन् रविंद्र चव्हाणांमध्ये जुंपली
- “गोपीचंद पडळकराचं राजकारण फडणवीसांच्या मेहरबानीपेक्षा भुंकण्यामुळे टिकलंय”
- कसब्यात हेमंत रासने विरूद्ध रविंद्र धंगेकर..! आघाडीने कसब्याची जागा काॅंग्रेसला सोडली