पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून आता घमासाम सुरू झालं आहे. भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप यांच्याच कुटुंबातून उमेदवारी देणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत उमेदवारीवरून घटक पक्षांमध्ये कुजबुज सुरू झाली आहे. यातच आमदार लक्ष्मण जगताप यांना आव्हान देणारे राहुल कलाटे यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू असून त्यांनी ही निवडणुक लढविणार असल्याचं अगोदरच स्पष्ट केले आहे.
मागील तीन विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांना राहुल कलाटे यांनी जोरदार लढत दिली. सुरूवातीला म्हणजे 2009 साली लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढविली होती. त्यावेळी लक्ष्मण जगताप यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या श्रीरंग बारणेंचा पराभव करत 78, 741 मत मिळवून विजयी झाले. त्यानंतरच्या लढती त्यांनी भाजपच्या तिकिटीवर लढवून 2014 आणि 2019 विधानसभेच्या निवडणुकीत राहुल कलाटे यांचा पराभव केला.
2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राहुल कलाटे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढली. त्यावेळी त्यांना जगताप यांच्या खालोखाल म्हणजे 63, 489 मतं मिळाली. त्यानंतर 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणुक लढविली असता. राहुल कलाटे यांना 1,12,225 इतंकी मत पडलीत. यावेळेच्या निवडणुकीत राहुल कलाटे यांनी लक्ष्मण जगताप यांना जोरदार टक्कर दिली.
पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचं भाष्य..! म्हणाले की, “झालं गेलं गंगेला मिळालं, आता..”
दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीकरीता राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आग्रही आहे. यातच आता राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळणार का ? याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून ही निवडणुक लढणार असल्याचं राहुल कलाटे यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही पोटनिवडणुसाठी आपला उमेदवार घोषीत करणार असल्याने त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- “फडणवीस अन् टिळकांची रात्री बंद दाराआड चर्चा, ‘समजूत’ काढली की ‘स्थान’ पक्के केले ?” चर्चांना उधाण
- कसबा पेठ पोटनिवडणुकीकरीता आघाडीचा उमेदवार ठरला…! बापटांना आव्हान देणाऱ्या नेत्याचं नाव निश्चित
- कसबा पेठ निवडणुक भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार
- पवार साहेब, उद्धव ठाकरे, पटोले अन् राज ठाकरे तुम्हालाही विनंती करतो की ही निवडणुक बिनविरोध व्हावी..;” बावनकुळे
- पवार साहेब, उद्धव ठाकरे, पटोले अन् राज ठाकरे तुम्हालाही विनंती करतो की ही निवडणुक बिनविरोध व्हावी..;” बावनकुळे