पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभेसाठी पोटनिवडणुक लागली आहे. आज महाविकास आघाडी आणि भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार निश्चित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काॅंग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. त्याची आज घोषणा महाविकास आघाडीकडून केली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपकडून स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांच्या नावाचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.
पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचं भाष्य..! म्हणाले की, “झालं गेलं गंगेला मिळालं, आता..”
भाजपचे खासदार गिरीश बापट यांचा बालेकिल्ला समजला जाणारा कसबा पेठ या मतदार संघातून मुक्ता टिळक यांनी 2019 साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणुक लढविली होती. त्या निवडणुकीत त्यांनी काॅंग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांच्यावर विजय मिळवला. त्याआधी गिरीश बापट यांना काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी जोरदार टक्कर दिली होती. यातच रविंद्र धंगेकर यांना मानणारा मोठा वर्ग कसबा पेठ विधानसभेत असल्याने काॅंग्रेसकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
संजय राऊत अन् नारायण राणेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळकांचं नाव या पोटनिवडणुकीसाठी सुरूवातीला चर्चेत आले होते. परंतु विरोधात महाविकास आघाडी आपला उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचं समजातच भाजपने मोठा डाव टाकला. भाजपने मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळकांना प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविल्याने त्यांचा घरात आता तिकीट मिळणे अवघड आहे. कारण एक व्यक्ती एक पद अशी सुरूवातीपासूनच भाजपची रणनीती राहिली आहे. त्यामुळे भाजपने टिळक कुटूबियांना या पोटनिवडणूकीतून आपोपाच बाद केले.
तब्बल 30 तास मतमोजणी, अमरावतीमध्ये धीरज लिंगाडे विजयी, भाजपचा सुपडा साफ
दरम्यान, पोटनिवडणुक जाहीर झाल्यापासून काॅंग्रेसने या जागेसाठी हालचाली सुरू केल्या. महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये उमेदवार निश्चित होण्याच्या अगोदरपासून काॅंग्रेसने येथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली. मतदार संघातील काही भागात तर काॅंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचे बॅनरही झळकले आहेत. या सगळ्या हालचाली पाहून महाविकास आघाडी या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार देणार असल्याचं समजताच भाजपने ही नवी खेळी केली आहे. आज भाजप आणि महाविकास आघाडीकडून आपला उमेदवार घोषीत केला जाणार आहे.
Read also
- कसबा पेठ निवडणुक भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार
- पवार साहेब, उद्धव ठाकरे, पटोले अन् राज ठाकरे तुम्हालाही विनंती करतो की ही निवडणुक बिनविरोध व्हावी..;” बावनकुळे
- पवार साहेब, उद्धव ठाकरे, पटोले अन् राज ठाकरे तुम्हालाही विनंती करतो की ही निवडणुक बिनविरोध व्हावी..;” बावनकुळे
- पवार साहेब, उद्धव ठाकरे, पटोले अन् राज ठाकरे तुम्हालाही विनंती करतो की ही निवडणुक बिनविरोध व्हावी..;” बावनकुळे
- “सुजान शिक्षकांनी भाजपला अक्षर:श लोळविले,” खुनशी राजकारण, जातीयवादी विष म्हणत राष्ट्रवादीने पुन्हा डिवचलं