अमरावती : राज्याच्या पाच पैकी चार शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल हाती लागला आहे. परंतु या निवडणुकांमध्ये अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी दुसऱ्या दिवशीही सुरू असल्याने यामध्ये जोरदार रंगत आली आहे. मात्र या निवडणुकीत सुरूवातीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे आघाडीवर असून त्यांना आतापर्यंत 46, 330 मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यामुळे आता सगळ्या कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा केला जात आहे.
“नारायण राणेंना केंद्रातून लवकरच डच्चू मिळणार, केंद्रातल्या खात्यातलं त्यांना काहीच कळत नाही”
बाद झालेली मत ही धीरज लिंगाडे यांना मिळाली असल्याचा दावा भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार रणजित पाटील यांनी केला होता. त्यानंतर या निवडणुकीची फेरमतमोजणी घेण्यात आली. त्यामध्ये धीरज लिंगाडे यांना बाद झालेली फक्त 30 तर रणजित पाटील यांना जवळपास 5000 ते 6000 मत मिळाली असल्याने त्यांनाच याचा फटका बसला आहे. रणजित पाटील यांना या निवडणुकीत 44, 262 मत पडली आहेत. त्यामुळे धीरज लिंगाडे सध्या रणजित पाटलांवर 3 हजार 368 मतांनी आघाडी घेऊन त्यांनी विजय संपादन केला आहे.
सत्यजीत तांबेंचा अखेर विजय, पण मामा थोरातांनी बाळगलेले मौन चर्चेत, पुढची भूमिका स्पष्ट करणार
धीरज लिंगाडे यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांचं आभार मानलं आहे. तसेच लवकरच ते मुंबईत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तसेच या पुढे ते महाविकास आघाडीकडूनच लढणार आहे. त्याचबरोबर ही तर सुरूवात आहे. आगामी सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपचा सुपडा साफ होईल. असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.
अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंनी बाजी मारली..! दणक्यात विजय, 20 हजार पेक्षा अधिक मताची आघाडी
दरम्यान, मतमोजणी केंद्रावर बाद झालेल्या मतांवर अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीची फेरमतमोजणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. तर ऊर्वरित चार मतदार संघात विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा आनंदउत्सोव साजरा केला आहे.
Read also
- “…मग त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती?” राष्ट्रवादीकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर
- सत्यजीत तांबेंना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत ;” नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
- पोटनिवडणुकांसाठी भाजपकडून आज उमेदवारांची घोषणा, हेमंत रासने, शंकर जगताप…
- तब्बल 48 तास उलटूनही मतमोजणी सुरूच, अमरवतीची निवडणुक चर्चेत, लिंगाडे आघाडीवर
- “संघर्षाच्या काळात संयम ठेऊन कसं जिंकता येतं हा सत्यजित तांबेंचा नवीन परिपाठ,”