पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे कसबा पेठ आणि चिंचडव या विधानसभेसाठी निवडणुक आयोगाने पोटनिवडणुक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करीत आहेत. तर उमेदवारीवरून तिन्ही पक्षात रस्सीखेस सुरू झाली आहे. त्यावरून भाजपने यावर टिका केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
सत्यजीत तांबेंचा अखेर विजय, पण मामा थोरातांनी बाळगलेले मौन चर्चेत, पुढची भूमिका स्पष्ट करणार
अंधेरी पोटनिवडणुकी वेळी, भाजपला नैतिकतेचे धडे देणारे, महाराष्ट्राच्या पंरपरेचा दाखला देणारे नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील तिन्ही नेते कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोट निवडणुकीच्या जागेसाठी एकमेकांचे लचके तोडताना दिसत आहेत. आता कुठं गेली बिनविरोध करण्याची परंपरा? असा सवाल भाजपने महाविकास आघाडीतील नेत्यांना केला आहे. त्यावर सुरज चव्हाण यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे.
अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंनी बाजी मारली..! दणक्यात विजय, 20 हजार पेक्षा अधिक मताची आघाडी
अंधेरी पोट निवडणुकीच्या वेळी समोर पराभव दिसत होता, म्हणून पळून गेलात ती नैतिकता नव्हती. लटके ताईंना दिलेला त्रास आठवतो ना? पंढरपुर, देगलूर, कोल्हापुर विधानसभा निवडणुकीच्या वेळी कुठे गेली होती नैतिकता ? असा सवाल सुरज चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर भाजपकडून नैतिकतेचे धडे घ्यावेत एवढे वाईट दिवस महाविकास आघाडीचे आले नाहीत. असं म्हणत सुरज चव्हाण यांनी भाजपला सुनावलं आहे.
पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन, आजच्या निवडणुक निकालांचा लेखाजोखा
दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने, गणेश बीडकर, आणि धीरज घाटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर काॅंग्रेसकडून रविंद्र धनगेंकर आणि अरविंद शिंदे यांच्या नावावर काॅंग्रेस गोटातून चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी, यांमध्येही खलबत्त सुरू झाली आहेत. तर मनसेही या मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अंधेरी पोट निवडणुकीच्या वेळी समोर पराभव दिसत होता म्हणून पळून गेलात ती नैतिकता नव्हती..लटके ताईना दिलेला त्रास आठवतो ना ? पंढरपूर,देगलूर,कोल्हापूर विधानसभा निवडणुकीच्या वेळी कुठे गेली होती नैतिकता ? भाजपकडून नैतिकतेचे धडे घ्यावेत एवढे वाईट दिवस महाविकास आघाडीचे आले नाहीत. https://t.co/hNDodnCJAZ
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) February 3, 2023
Read also
- सत्यजीत तांबेंना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत ;” नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
- पोटनिवडणुकांसाठी भाजपकडून आज उमेदवारांची घोषणा, हेमंत रासने, शंकर जगताप…
- तब्बल 48 तास उलटूनही मतमोजणी सुरूच, अमरवतीची निवडणुक चर्चेत, लिंगाडे आघाडीवर
- “संघर्षाच्या काळात संयम ठेऊन कसं जिंकता येतं हा सत्यजित तांबेंचा नवीन परिपाठ,”
- “नारायण राणेंना केंद्रातून लवकरच डच्चू मिळणार, केंद्रातल्या खात्यातलं त्यांना काहीच कळत नाही”