नाशिक : राज्याच्या पाच विभागात होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांचा कल हाती लागला आहे. कोकणची शिक्षक मतदार संघाची जागा भाजपच्या ताब्यात गेली आहे. तर नागपुर, औरंगाबाद ची जागा महाविकास आघाडीने राखली आहे. तर अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणुक चुरसीची ठरली आहे. तर दुसरीकडे नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली आहे.
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर कसब्यातून शैलेश टिळकांनी अर्ज घेतला, पोटनिवडणुकीची रंगत वाढणार
एनवेळी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी बंडाळी केल्याने आघाडीत मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर अपक्ष म्हणून सत्यजीत तांबे यांनी निवडणुक लढवली. सत्यजी तांबे यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजीत तांबे यांच्या फक्त विजयाची घोषणा शिल्लक राहिली आहे.
“पदवीधर, शिक्षक निवडणुकीत नो पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन”, थेट मतपत्रिकांवर उल्लेख
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांना 45660 मत तर त्यांच्या विरोधात असलेल्या शुंभागी पाटलांना 24927 मत मिळाली आहे. यांच्यामध्ये जवळपास 20 हजार पेक्षा मतांचा फरक आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
औरंगाबादमधून विक्रम काळे आघाडीवर, भाजपला औरंगाबादमध्ये धक्का बसणार
दरम्यान, दुसरीकडे अमरावतीची पदवीधर मतदार संघाची निवडणुक शेवटपर्यंत चुरसीची ठरली आहे. या पदवीधर निवडणुकीत भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार रणजित पाटील यांना 33 हजार 799 मत मिळाली आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धीरज लिंगाडे यांना 35, 375 मत मिळवून ते सुरूवातीपासून आघाडीवर राहिले आहेत. यांच्यात फक्त 1 हजार पेक्षा अधिक मतांचा फरक आहे. त्यामुळे याठिकाणी लिंगाडे यांचा विजय पक्का मानला जात आहे.
Read also
- पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन, आजच्या निवडणुक निकालांचा लेखाजोखा
- “नागपुरची जागा भाजपने लढविली नाही, जर लढविली असती तर ती जिंकलीच असती”, चंद्रशेखर बावनकुळे
- अमरावतीमध्ये भाजप अन् आघाडीमध्ये काट्टे की टक्कर, फक्त 680 मतांची आघाडी
- “दया कुछ तो गडबड है..! फडणवीसांची जादू सगळीकडे चालली, पण नागपुरात का नाही?”
- फडणवीसांच्या नागपुरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी