नागपुर : महाविकास आघाडीकडून असलेले नागपुर शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुधाकर आडबाले विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी या निवडणुकीत मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. कार्यकर्त्यांकडून नागपुरात जल्लोष केला जात आहे. कार्यकर्त्यांकडून नाचून आनंद साजरा केला जात आहे. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा देखील कार्यकर्त्यांकडून घातल्या जात आहेत. यातच आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे.
नागपुर, औरंगाबाद, अन् अमरावतीत भाजपला जोरदार धक्का, सगळेच उमेदवार पिछाडीवर
नागपुर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत सुधाकर आडबाले यांना १४ हजार ०६१ मत पडली आहेत. जवळपास त्यांनी ६ हजार ३०६ मतांनी आघाडी घेतली आहे. नागपुरचे विद्यमान आमदार आणि भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार नागो गाणार हे पिछाडीवर पडले आहेत. त्यांना फक्त ६३०९ मतं पडली आहेत. त्यामुळे भाजपला या मतदार संघात मोठा धक्का बसला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने खातं उघडलं, विद्यमान आमदाराचा झाला पराभव
भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका, नागपुर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. असा दावा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली, जगभरात चालली मात्र नागपुरमध्ये का नाही चालली? असा सवाल करत दया कुछ तो गडबड है, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
पाटील महादेवाच्या दर्शनासाठी, सत्यजीत तांबे अज्ञात स्थळी, नाशिकच्या निवडणुकीत रंगत
दोन वर्षापासून या निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात केली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पुरस्कृत केलं आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध ३४ संस्थाचा मला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, या पक्षातील सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन मला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो . असं सुधाकर आडबाले यांनी म्हटले आहे.
देवेंद्रजी फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली , जगभरात चालली मात्र नागपुर मध्ये का नाही चालली ? “दया कुछ तो गडबड है”
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 2, 2023
Read also
- फडणवीसांच्या नागपुरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी
- चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर कसब्यातून शैलेश टिळकांनी अर्ज घेतला, पोटनिवडणुकीची रंगत वाढणार
- “पदवीधर, शिक्षक निवडणुकीत नो पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन”, थेट मतपत्रिकांवर उल्लेख
- “कर्नाटकला पैसे दिले मग महाराष्ट्राने काय पाप केलं”, अजित पवारांचा केंद्र सरकारवर संताप
- औरंगाबादमधून विक्रम काळे आघाडीवर, भाजपला औरंगाबादमध्ये धक्का बसणार