नागपुर : महाविकास आघाडीकडून असलेले नागपुर शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुधाकर आडबाले विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी या निवडणुकीत मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. कार्यकर्त्यांकडून नागपुरात जल्लोष केला जात आहे. कार्यकर्त्यांकडून नाचून आनंद साजरा केला जात आहे. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा देखील कार्यकर्त्यांकडून घातल्या जात आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने खातं उघडलं, विद्यमान आमदाराचा झाला पराभव
नागपुर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत सुधाकर आडबाले यांना १४ हजार ०६१ मत पडली आहेत. जवळपास त्यांनी ६ हजार ३०६ मतांनी आघाडी घेतली आहे. नागपुरचे विद्यमान आमदार आणि भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार नागो गाणार हे पिछाडीवर पडले आहेत. त्यांना फक्त ६३०९ मतं पडली आहेत. त्यामुळे भाजपला या मतदार संघात मोठा धक्का बसला आहे.
पाटील महादेवाच्या दर्शनासाठी, सत्यजीत तांबे अज्ञात स्थळी, नाशिकच्या निवडणुकीत रंगत
दोन वर्षापासून या निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात केली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पुरस्कृत केलं आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध ३४ संस्थाचा मला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, या पक्षातील सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन मला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो . असं सुधाकर आडबाले यांनी म्हटले आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी..! उमेदवारीसाठी आज बैठकांचा सत्र
दरम्यान, नागपुरमध्ये भाजपला दणका, असं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांनी म्हटले आहे.
Read also
- चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर कसब्यातून शैलेश टिळकांनी अर्ज घेतला, पोटनिवडणुकीची रंगत वाढणार
- “पदवीधर, शिक्षक निवडणुकीत नो पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन”, थेट मतपत्रिकांवर उल्लेख
- “कर्नाटकला पैसे दिले मग महाराष्ट्राने काय पाप केलं”, अजित पवारांचा केंद्र सरकारवर संताप
- औरंगाबादमधून विक्रम काळे आघाडीवर, भाजपला औरंगाबादमध्ये धक्का बसणार
- नागपुर, औरंगाबाद, अन् अमरावतीत भाजपला जोरदार धक्का, सगळेच उमेदवार पिछाडीवर