नाशिक : राज्यात पाच विभागात झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणुक जास्त चर्चेची ठरली होती. या निवडणुकीत अपक्ष आमदार डॉ. सुधीत तांबे विरूद्ध शुंभागी पाटील अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे याकडे आता सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
फसवा अन् चुनावी जुमला असलेला हा अर्थसंकल्प”; पवारांची केंद्र सरकारवर जोरदार टिका
आज शुंभागी पाटील यांनी त्र्यंबकेश्वर येथील महादेवाचं दर्शन घेतलं. त्याआधी ही निवडणुक मीच जिंकणार असल्याचा त्यांनी दावा केला. विजय फार दुर नाही, फार चांगल्या मतांनी हा विजय होईल. मतदान 1 लाख 29 हजार 456 इतकं झालं आहे. त्यातून बाद होणाऱ्या मतांनंतर कोटा ठरवला जाईल. जे प्रमाण ठरवलं जाईल, त्यानुसार विजयी उमेदवार ठरेल. त्यानुसार विजयासाठी जो कोटो आहे, त्यापेक्षा जास्त मतदारांना मी वैयक्तिकरीत्या ओळखते. त्यामुळे विजय माझाच आहे. असं शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे.
“केंद्र सरकार माझ्यावर टपून बसलाय, मला केव्हाही अटक करून तुरूंगात टाकतील”; आव्हाडांचा खळबळजनक दावा
यातच सत्यजीत तांबे कालपासून नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचा फोन कालपासून लागत नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आलं आहे. तर आज सांयकाळी 3 वाजता ते मतमोजणी केंद्रावर येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे. काॅंग्रेसविरोधात बंडाळी केल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढविली आहे. त्यांना भाजपने अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.
उमेदवारांच्या याद्या, तयारीही जोरात, फक्त राज ठाकरेंचा आदेश..! कसबा पेठ पोटनिवडणुकीत मनसे मैदानात
दरम्यान, नाशिक विभागात एकूण 2 लाख 62 हजार 731 मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदार अहमदनगर जिल्ह्यात असून ही संख्या 1 लाख 15 हजार 638 मतदार आहेत. तर नाशिक जिल्ह्यात 69 हजार 652, जळगाव जिल्हायत 35 हजार 58, धुळे जिल्ह्यात 23 हजार 412, नंदुरबार जिल्ह्यात 18 हजार 971 इतके मतदार होते. तर 338 मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान झालं आहे.
Read also
- कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी..! उमेदवारीसाठी आज बैठकांचा सत्र
- नागपुरमध्ये नागो गाणार विरूद्ध सुधाकर आडबाले…! गुलाल कोण उधळणार ?
- “नाशिकमध्ये शुंभागी पाटील विरूद्ध सत्यजीत तांबे, कोण बाजी मारणार ?” आज फैसला
- “आकड्यांचा खेळ अन् गुलाबी स्वप्ने यापलिकडे अर्थसंकल्पात काही नाही”, नाना पटोले
- फसवा अन् चुनावी जुमला असलेला हा अर्थसंकल्प”; पवारांची केंद्र सरकारवर जोरदार टिका