नागपुर : विधान परिषदेच्या पाच विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरू झाली आहे. आज सकाळपासून पाचही विभागात मतमोजणीला सुरूवात झाली आहे. आज सांयकाळी उशिरा या सर्व मतदार संघातील निवडणुकीचा निकाल हाती लागणार आहे. पाचही विभागात महाविकास आघाडी आणि भाजप अशी थेट लढत झाली आहे. काही ठिकाणी भाजपने आपले उमेदवार न देता अपक्षांना आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
उमेदवारांच्या याद्या, तयारीही जोरात, फक्त राज ठाकरेंचा आदेश..! कसबा पेठ पोटनिवडणुकीत मनसे मैदानात
नागपुरमध्ये महाविकास आघाडीकडून सुधाकर आडबोले विरूद्ध भाजपचे उमेदवार नागो गाणार अशी लढत झाली आहे. नागपुर या विभागात शिक्षक मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. याआधी या मतदार संघात नागो गाणार हे आमदार राहिले आहेत . 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 83 टक्के तर यावर्षी 86.26 टक्के मतदारांनी मतदान केले आहे. यात 90.30 टक्के पुरूष तर 80. 80 महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.
हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवर..! मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या बॅंकवर ईडीचा छापा
राज्यातील नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुक चांगलीच चर्चेची ठरली आहे. यातच सत्यजीत तांबे कालपासून नॉटरिचेबल झाले आहेत. आज दुपारी 3 वाजता ते मतदान केंद्रावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर मतदारांनी शुंभागी पाटलांना स्विकारलं आहे. हा विजय फार दुर नाही. एक चांगल्या मतांनी आमचा विजय होईल. असा विश्वास शुंभागी पाटील यांनी व्यक्त केला आहे.
“कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा रंगला कट्टा”, सर्वपक्षीय नेत्यांचा मतदारसंघावर दावा
दरम्यान, नाशिक पदवीधर संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली आहे. आज सकाळी मत पेट्या उघडल्या असून त्यातील वैध आणि अवैध मतांची छाननी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पोस्टल मतं देखील बाजूला काढून त्याची छाननी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली असून आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.
Read also
- “नाशिकमध्ये शुंभागी पाटील विरूद्ध सत्यजीत तांबे, कोण बाजी मारणार ?” आज फैसला
- “आकड्यांचा खेळ अन् गुलाबी स्वप्ने यापलिकडे अर्थसंकल्पात काही नाही”, नाना पटोले
- फसवा अन् चुनावी जुमला असलेला हा अर्थसंकल्प”; पवारांची केंद्र सरकारवर जोरदार टिका
- फसवा अन् चुनावी जुमला असलेला हा अर्थसंकल्प”; पवारांची केंद्र सरकारवर जोरदार टिका
- “केंद्र सरकार माझ्यावर टपून बसलाय, मला केव्हाही अटक करून तुरूंगात टाकतील”; आव्हाडांचा खळबळजनक दावा