पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुक लागली आहे. त्यासाठी अद्यापही कोणत्याही पक्षांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही. परंतु त्यातच आज पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा कट्टा एफसी रोडवरील वाडेश्वर ढाब्यावर रंगला. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या नेत्यांनी सहभाग घेतला.
“बजेट सुरू असताना मोदी मोदीचा जय जय, दुसरीकडे विरोधकांकडून भारत जोडो च्या घोषणा”
मुक्ता टिळक यांचे पती शैलश टिळक यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्याकडे आता भाजप श्रेष्ठ काय निर्णय घेतात त्याकडे आमचं लक्ष्य आहे. असं शैलश टिळक यांनी यावेळी म्हटलं. आम्ही महाविकास आघाडी म्हणून काॅंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. परंतु महाविकास आघाडी म्हणून जे काही निर्णय घेतला जाईल, त्याला मी बांधील आहे. असं काॅंग्रेसचे इच्छुक उमेदवार रविंद्र धनगेंकर यांनी सांगितलं. तसेच ही पोटनिवडणुक भावनेच्या, हिंदुत्वाच्या मुद्यावर होणार नसून ही निवडणुक विकासाच्या मुद्यावर होईल, असंही त्यांनी सांगितलं.
“राष्ट्रवादीचा आमदार बंड करण्याच्या तयारीत, शिंदेंच्या भेटीने राष्ट्रवादीत खळबळ”
कसबा पेठ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार कुणीही असो, त्याचा निर्णय महाविकास आघाडी घेईल. त्या निर्णयाला येथील शिवसैनिक बांधील राहतील, अन् जो उमेदवार उभा राहिल, त्याला खांद्यावर घेऊन आनंद साजरा करतील. असं शिवसेनेकडून इच्छुक असणारे उमेदवार विशाल धनवडे यांनी सांगितलं. तसेच भाजपनेच मुक्ता टिळक यांच्या निधनाच्या सहानुभूतीचा विषय घालवला आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षात असं चालु असेल तर आमचं त्यांच्याविरोधात लढणं हे कामच आहे.त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल. अशी खात्री राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार रविंद्र माळोदकर यांनी व्यक्त केली.
“सरकारी कंपन्या विकण्यावर केंद्र भर देणार नाही ही बजेटमधून अपेक्षा”, रोहित पवारांचा मोदींना टोला
दरम्यान, कसबा पेठ निवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी जे काही प्रयत्न करीत आहे. त्यांनी याआधी काय केलं होतं. याचाही त्यांनी विचार केला पाहिजे. त्यामुळे आमच्याकडून ती अपेक्षा करणं हे कितपत योग्य आहे. त्यामुळे या निवडणुकीकरीता तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित निर्णय घेतील. त्यामुळे ही जागा भाजपकडे बऱ्याच वर्षापासून होती. ती जागा आता महाविकास आघाडीकडून खेचून आणण्यासाठी प्रयत्न होतील. असं राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार अंकुश काकडे यांनी सांगितले.
Read also
- कसबा पेठ विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीचीच..! इच्छुक उमेदवारांची नावं जाहीर
- “सुनील शेळकेंना भेटून, योग्य तो निर्णय घेऊ”, अजित पवारांचं शेळकेंबाबत मोठं वक्तव्य
- “आजच्या अर्थसंकल्पातून सामान्यांची ‘निर्मल’ आशा धुळीस मिळाली”; जितेंद्र आव्हाड
- “महागाई, बेरोजगारीपासून दिलासा नाहीच, उलट घोषणा, आश्वासन देऊन निवडणुका जिंकण्याचा डाव”
- मोदींच्या शेवटच्या बजेटमधील कररचनेत मोठे बदल, 7 लाखांपर्यंत कर सवलत