मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा शेवटचा बजेट सादर केला आहे. या बजेटमध्ये अनेक मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकां डोळ्यासमोर ठेऊन अनेक घोषणांचा पाऊस या बजेटमध्ये पाडण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“थोडा थांबा..! लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”; बच्चू कडूंचा आशावाद
देशाचा अर्थसंकल्प हा देशाची पुढची वाटचाल आणि भविष्यात आपण काय करणार आहोत. हे सांगितलं जातं. बेरोजगारी, करवाढ, करसवलती, यावरून आज जगात आर्थिक मंदी असतांना त्याच्याशी सामना कसा करेल, ही निर्मल आशा देखील धुळीस मिळाली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काहीच मिळेल असं काहीच चित्र नाही. अशी खोचक टिका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
“रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे”, सदाभाऊंचा रोहित पवारांना टोला
अर्थसंकल्प म्हणजे फुगवलेला फुगा असतो. परंतु त्यात सत्यता काहीच नसते. ज्या पद्धतीने जीडीपी मॅनेज करीत आहेत. त्यावरून असं वाटतं की हे सगळे अर्थसंकल्प फुगवलेले फुगे आहेत. त्याच्या व्यक्तिरिक्त या फुग्यामध्ये काहीच नाही. तसेच गौतम अडाणींनी केलेला फ्रॉड वृत्तपत्रात येतच नाही. त्यामुळे त्याबद्दल मला काहीच कल्पना नाही. असं म्हणत त्यांनी गोदी मिडीयावरही भाष्य केलं.
“भाजपने पाळलेला वळू म्हणजे किरीट सोमय्या;” अनिल परबांचा सोमय्यांवर हल्लाबोल
दरम्यान, आज सादर होणारे मोदी सरकारचे शेवटचे बजेट सादर केला आहे. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये जनतेला महागाई, बेरोजगारीपासून दिलासा नाहीच उलट आश्वासन, घोषणा, भुलथापा देऊन 2023 ची लोकसभा जिंकण्याचा मोदींचा डाव आहे. असं रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे. यातच आगामी काळात कर्नाटकात विधानसभेची निवडणुक होत आहे. त्यामुळे कर्नाटकसाठी केंद्र सरकारने मोठी तरतुद केली आहे.
Read also
- “महागाई, बेरोजगारीपासून दिलासा नाहीच, उलट घोषणा, आश्वासन देऊन निवडणुका जिंकण्याचा डाव”
- मोदींच्या शेवटच्या बजेटमधील कररचनेत मोठे बदल, 7 लाखांपर्यंत कर सवलत
- “बजेट सुरू असताना मोदी मोदीचा जय जय, दुसरीकडे विरोधकांकडून भारत जोडो च्या घोषणा”
- “राष्ट्रवादीचा आमदार बंड करण्याच्या तयारीत, शिंदेंच्या भेटीने राष्ट्रवादीत खळबळ”
- “सरकारी कंपन्या विकण्यावर केंद्र भर देणार नाही ही बजेटमधून अपेक्षा”, रोहित पवारांचा मोदींना टोला