नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील आज शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण सादर करीत आहेत. आतापर्यंत मोदी सरकारच्या काळात 10 बजेट सादर झाले असून यामध्ये अरूण जेटील, पीयुष गोयल आणि निर्मला सीतारमण ह्या तीन अर्थमंत्र्यांनी पाच बजेट सादर केले आहेत. देशाच्या इतिहासातलं सर्वात लांब बजेट भाषण आणि पहिलं पेपरलेस बजेट सीतारमण यांच्या नावावर आहे. आज सादर केलेल्या बजेटमुळे शेअर मार्केटमध्ये तेजी बघायला मिळाली आहे.
सकाळी आंदोलन, दुपारी लगेचच निर्णय..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या निर्णयांचा धडका
केंद्रीय अर्थसंकल्पात यावेळी 7 म्हणजे सप्तऋर्षींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात सर्वसमावेश विकास, अंत्योदयापर्यंत पोहोच, पायाभुत सुविधा आणि गुंतवणुक, क्षमतेची वाढ, हरीत विकास, युवा ऊर्जा, आणि आर्थिक क्षेत्र यावर भर देण्यात आला आहे. उद्योगपती गौतम अडाणी यांच्यामुळे बाजार खाली कोसळला होता. परंतु अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदर सकाळपासून बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत 60 हजारांच्या खाली आलेला सेसेंक्स थोड्यावेळापुर्वी 60 हजारांच्या वर गेला. अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये जवळपास 500 अंकाची वाढ झाली आहे.
“लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हा..;” शेळकेंच्या आरोपांवर लांडगेंचं प्रत्यु्त्तर
देशात लवकरच 5 जी सेवांचा वापर करणारे अॅल्पिकेशन तयार करण्यासाठी देशभरातल्या इंजिनिअरिंग संस्थांमध्ये 100 लॅब्ज उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ई कोर्टसच्या तिसऱ्या टप्प्याची सुरूवात केली जाणार आहे. त्यासाठी 7 हजार कोटींची तरतुद करण्यात आल्याची माहिती निर्मला सितारमण यांनी दिली.
सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर…! चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 50 नव्या विमानतळांची घोषणा केली आहे. त्याचबरोबर सर्व शहरांमध्ये ड्रनेज व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यात मॅनहोलचं रूपांतप मशीन होलमध्ये करण्यात येणार आहे. तसेच 2.40 लाख कोटी रूपयांची रेल्वेसाठी तरतुद करण्यात आली आहे. यातच अर्थसंकल्पीय भाषण सुरू असतांना नव्या योजनांवर सत्ताधाऱ्यांकडून मोदी मोदी च्या घोषणा केल्या जात असतांना विरोधकांकडून भारत जोडो च्या घोषणा देण्यात आल्या.
Read also
- “राष्ट्रवादीचा आमदार बंड करण्याच्या तयारीत, शिंदेंच्या भेटीने राष्ट्रवादीत खळबळ”
- “सरकारी कंपन्या विकण्यावर केंद्र भर देणार नाही ही बजेटमधून अपेक्षा”, रोहित पवारांचा मोदींना टोला
- “थोडा थांबा..! लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”; बच्चू कडूंचा आशावाद
- “रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे”, सदाभाऊंचा रोहित पवारांना टोला
- “भाजपने पाळलेला वळू म्हणजे किरीट सोमय्या;” अनिल परबांचा सोमय्यांवर हल्लाबोल