पुणे : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचं अलिकडेच दिर्घ आजाराने निधन झालं. त्यानंतर निवडणुक आयोगाने चिंचवड पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. उद्यापासून या पोटनिवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी या पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण यातच लक्ष्मण जगताप यांच्या निधनाआधी भाजपने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनी केला आहे. त्यावर आता भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
“पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे भाजपला आता कसे सुचले”, शरद पवारांचा भाजपला सवाल
कसबा पेठ आणि चिंचवड येथील विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून इतर राजकीय पक्षांना पत्र पाठवलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुनिल शेळके यांनी भाजपवर आरोप केले आहेत. पंढरपुर येथे पोटनिवडणुक लागली तेव्हा भाजपने सहानुभूतीचा विचार केला नाही, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते. तेव्हा भाजपने तीन महिन्यापासून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली. अशा ठिकाणी सहानुभूतीचा विचार करावा का ? असा सवाल सुनिल शेळके यांनी केलाय.
“लबाड बोका ढोंग करतोय”; कळव्यात राष्ट्रवादी अन् शिंदे गटामध्ये जोरदार बॅनरबाजी..!
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, राष्ट्रवादी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी उमेदवारीसाठी दावा केला असला तरी राष्ट्रवादीची ताकद या चिंचवड मतदारसंघात आहे. महाविकास आघाडीचा विचार करत असतांना नक्कीच पक्षश्रेष्ठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विचार करेल. राजकीय डाव म्हणून पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला जातो. पण आता पुरस्कृत करण्याची गरज नाही असे देखील सुनील शेळके यांनी स्पष्ट केले आहे.
त्यावर महेश लांडगे म्हणाले की, आम्ही निवडणुकीची अशी काय तयारी केली, हे सुनील शेळके यांना जाणवल्याचं माहित नाही. संघटना मजबूत व्हावी, कार्यकर्ते कायम क्रियाशील राहावे यासाठी काम केलं जातं. पक्षाकडून दैनंदिन आढावा घेतला जातो. शक्ती केंद्र, बुथ प्रमुख, मतदार यांदयाची चर्चा कायम केली जाते. मात्र दिवंगत लक्ष्मण जगताप आजारी असतांना आम्ही असंवेदशील भूमिका घेतली, हा आरोप योग्य नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- “हिमंत असेल तर ये इथे”; अनिल परब किरीट सोमय्यांवर भडकले
- सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर…! चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
- “ठाण्यात शिंदेंकडून राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता, 15 ते 20 नगरसेवक बंडाळीच्या दिशेने”
- “लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हाच भाजपची पोटनिवडणुकीची तयारी”
- “राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरू निवड समित्या जाहीर “