मुंबई : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगूरू निवड समित्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगूरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठित केल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरू निवड समिती गठीत करण्यात आली आहे. तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरीता कुलगुरू निवड समिती जाहीर करण्यात आली आहे.
“हिंदू नव्हे, भाजपची सत्ता संकटात…;” हिंदू आक्रोश मोर्चावर काॅंग्रेसची प्रतिक्रिया
आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा सुरेश कुमार हे मुंबई विद्यापीठ कुलगूरू निवड समितीचे अन्य सदस्य असतील. तर आयआयटी कानपुरचे संचालक डॉ अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ मीना चंदावरकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू निवड समितीचे अन्य सदस्य असतील.
सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर..! सत्यजीत तांबेंचं त्यावर प्रत्युत्तर काय?
मुंबई विद्यपीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी संपल्याने विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिंगबर शिर्के यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ दिनांक 18 मे 2022 संपल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळे यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
Read also
- “पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे भाजपला आता कसे सुचले”, शरद पवारांचा भाजपला सवाल
- “लबाड बोका ढोंग करतोय”; कळव्यात राष्ट्रवादी अन् शिंदे गटामध्ये जोरदार बॅनरबाजी..!
- “महागाई, चिनी सैन्याची घुसखोरी, BBC डॉक्युमेंट्री, हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी,”, मोदींचा शेवटचा बजेट गाजणार
- संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई करणार का ?
- “मी अपक्ष म्हणून फार्म भरलाच नव्हता, सगळं उघड करणार..;” सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसला इशारा