पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी विरोधकांना पत्र पाठवून निवडणुक बिनविरोध होण्याची भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत कसबा पेठ विधानसभेतून पोटनिवडणुकीसाठी पाच इच्छुक उमेदवारांची यादी केंद्रीय निवड समितीकडे पाठवली आहे. तसेच निवडणुक बिनविरोध होण्यासाठी आम्ही सर्व पक्षांना पत्र पाठवणार आहोत. असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर..! सत्यजीत तांबेंचं त्यावर प्रत्युत्तर काय?
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनवरोध व्हाव्यात यासाठी चंद्रकांत पाटील पत्र लिहिणार आहेत. ते कोणाला पत्र लिहिणार आहेत, या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही.कोल्हापूर, पंढरपूर व नांदेडमध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यामुळे आता पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे त्यांना आत्ताच कसे सुचलं कळत नाही. असा टोला शरद पवार यांनी लगावला.
शिवसेना, धनुष्यबाणा संदर्भात ठाकरे अन् शिंदे गटाचं लेखी उत्तर…! निवडणुक आयोगाकडे दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. यावर चर्चाच होऊ शकत नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय यावर कोण काही बोलतेय याकडे आम्ही लक्ष देत नाही. परंतु आमचा अनुभव आहे की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे.
Read also
- “लबाड बोका ढोंग करतोय”; कळव्यात राष्ट्रवादी अन् शिंदे गटामध्ये जोरदार बॅनरबाजी..!
- “महागाई, चिनी सैन्याची घुसखोरी, BBC डॉक्युमेंट्री, हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी,”, मोदींचा शेवटचा बजेट गाजणार
- संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई करणार का ?
- “मी अपक्ष म्हणून फार्म भरलाच नव्हता, सगळं उघड करणार..;” सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसला इशारा
- “हिंदू नव्हे, भाजपची सत्ता संकटात…;” हिंदू आक्रोश मोर्चावर काॅंग्रेसची प्रतिक्रिया