ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बाल्लेकिल्ल्यातील जवळपास 20 पेक्षा अधिक नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यावरून चांगलीच बॅनरबाजी सुरू झालीय. त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
शिवसेना, धनुष्यबाणा संदर्भात ठाकरे अन् शिंदे गटाचं लेखी उत्तर…! निवडणुक आयोगाकडे दाखल
कळव्यातील जागोजागी लागलेल्या नगरसेवकांनो स्वत:ला विकू नका,अशा बॅनर्सद्वारे शिंदे गटाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सोमवारी याच बॅनवर लबाड बोका ढॉंंग करतोय. या आशयाचे फलक झळकवून आव्हाड यांना प्रत्यु्त्तर देणाऱ्या या नव्या बॅनरची शहरात चर्चा सुरू झाली होती.
पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘रामराज्य’ : शिंदे-फडणवीस सरकारची आमदार लांडगेंना ताकद!
करून करून भागले, नि प्रवचन झोडू लागले, नगरसेवक तुमचे तुमच्या हातून चालले, विश्वास नाही उरला तुमच्या तुमच्याच नगरसेवकांनावर आता? आधी गळ्यात गळे आणि आता एकदम लाथ, पायाखाली बघा तुमच्या, दुसऱ्याकडे कशाला बोट? मुंब्रा कळव्याच्या विकासाचं फुका लाटता श्रेय, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून टिकास्त्र सोडण्यात आल्यामुळे अशा बॅनर्सवरून कळवा-मुंब्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
Read also
- “महागाई, चिनी सैन्याची घुसखोरी, BBC डॉक्युमेंट्री, हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी,”, मोदींचा शेवटचा बजेट गाजणार
- संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई करणार का ?
- “मी अपक्ष म्हणून फार्म भरलाच नव्हता, सगळं उघड करणार..;” सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसला इशारा
- “हिंदू नव्हे, भाजपची सत्ता संकटात…;” हिंदू आक्रोश मोर्चावर काॅंग्रेसची प्रतिक्रिया
- सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर..! सत्यजीत तांबेंचं त्यावर प्रत्युत्तर काय?