नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सकाळी 11 वाजता सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या अर्थसंकल्पात महागाई, चिनी सैन्याची घुसखोरी, बीबीसी डॉक्युमेंट्री, काश्मिरी पंडितांची सुरक्षा, राम रहिमचा पॅरोल, हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘रामराज्य’ : शिंदे-फडणवीस सरकारची आमदार लांडगेंना ताकद!
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. नरेंद्र मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांचा आप, केसीआर यांचा बीआरएस यासह अनेक विरोधी पक्ष राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकू शकण्याची शक्यता आहे.
“माझाच विजय झाला आहे, आता फक्त निकालाची वाट”, मतमोजणीआधी सत्यजीत तांबेंचा विश्वास
त्याआधी एक दिवस सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत 27 पक्षांचे 37 नेते उपस्थित होते. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, बैठक चांगली झाली. सभागृहाचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी आम्ही विरोधकांचे सहकार्य मागतो. आम्ही सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार आहोत. या बैठकीला काॅंग्रेस आणि सपाचे नेते उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काॅंग्रेस पक्षाने पत्र लिहून कळवले होते की, खराब हवामानामुळे ते काश्मिरमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांचे नेते येऊ शकले नाहीत. 31 जानेवारील पक्षाकडून स्वतंत्रपणे चर्चा केली जाईल.
Read also
- संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई करणार का ?
- “मी अपक्ष म्हणून फार्म भरलाच नव्हता, सगळं उघड करणार..;” सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसला इशारा
- “हिंदू नव्हे, भाजपची सत्ता संकटात…;” हिंदू आक्रोश मोर्चावर काॅंग्रेसची प्रतिक्रिया
- सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर..! सत्यजीत तांबेंचं त्यावर प्रत्युत्तर काय?
- शिवसेना, धनुष्यबाणा संदर्भात ठाकरे अन् शिंदे गटाचं लेखी उत्तर…! निवडणुक आयोगाकडे दाखल