मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेक पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठी फुट पडली. त्यामुळे अनेक आमदार, खासदार, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. यातच आता शिंदेंनी राष्ट्रवादीलाही ठाण्यात मोठा खिंडार पडण्याची शक्यता आहे.
संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई करणार का ?
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातील 15 ते 16 माजी नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन त्यापैकी ठाणे आणि कळवा भागातील पाच माजी नगरसेवक थेट बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. तर मुंब्रा भागातील माजी नगरसेवक विकास आघाडी करून त्यामाध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे.
“मी अपक्ष म्हणून फार्म भरलाच नव्हता, सगळं उघड करणार..;” सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसला इशारा
आमदार जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेनेकडून ही खेळी खेळली जात असल्याची चर्चा असून यामुळे राष्ट्रवादीत मोठी फुट पडण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे ठाण्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं आहे. कळव्यातील जागोजागी लागलेल्या नगरसेवकांनो स्वत:ला विकू नका,अशा बॅनर्सद्वारे शिंदे गटाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सोमवारी याच बॅनवर लबाड बोका ढॉंंग करतोय. या आशयाचे फलक झळकवून आव्हाड यांना प्रत्यु्त्तर देणाऱ्या या नव्या बॅनरची शहरात चर्चा सुरू झाली होती.
“हिंदू नव्हे, भाजपची सत्ता संकटात…;” हिंदू आक्रोश मोर्चावर काॅंग्रेसची प्रतिक्रिया
करून करून भागले, नि प्रवचन झोडू लागले, नगरसेवक तुमचे तुमच्या हातून चालले, विश्वास नाही उरला तुमच्या तुमच्याच नगरसेवकांनावर आता? आधी गळ्यात गळे आणि आता एकदम लाथ, पायाखाली बघा तुमच्या, दुसऱ्याकडे कशाला बोट? मुंब्रा कळव्याच्या विकासाचं फुका लाटता श्रेय, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून टिकास्त्र सोडण्यात आल्यामुळे अशा बॅनर्सवरून कळवा-मुंब्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
Read also
- “लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हाच भाजपची पोटनिवडणुकीची तयारी”
- “राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरू निवड समित्या जाहीर “
- “पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे भाजपला आता कसे सुचले”, शरद पवारांचा भाजपला सवाल
- “लबाड बोका ढोंग करतोय”; कळव्यात राष्ट्रवादी अन् शिंदे गटामध्ये जोरदार बॅनरबाजी..!
- “महागाई, चिनी सैन्याची घुसखोरी, BBC डॉक्युमेंट्री, हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी,”, मोदींचा शेवटचा बजेट गाजणार