पुणे : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचं अलिकडेच दिर्घ आजाराने निधन झालं. त्यानंतर निवडणुक आयोगाने चिंचवड पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. उद्यापासून या पोटनिवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी या पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण यातच लक्ष्मण जगताप यांच्या निधनाआधी भाजपने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनी केला आहे.
“मी अपक्ष म्हणून फार्म भरलाच नव्हता, सगळं उघड करणार..;” सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसला इशारा
कसबा पेठ आणि चिंचवड येथील विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून इतर राजकीय पक्षांना पत्र पाठवलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुनिल शेळके यांनी भाजपवर आरोप केले आहेत. पंढरपुर येथे पोटनिवडणुक लागली तेव्हा भाजपने सहानुभूतीचा विचार केला नाही, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते. तेव्हा भाजपने तीन महिन्यापासून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली. अशा ठिकाणी सहानुभूतीचा विचार करावा का ? असा सवाल त्यांनी केलाय.
“हिंदू नव्हे, भाजपची सत्ता संकटात…;” हिंदू आक्रोश मोर्चावर काॅंग्रेसची प्रतिक्रिया
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, राष्ट्रवादी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी उमेदवारीसाठी दावा केला असला तरी राष्ट्रवादीची ताकद या चिंचवड मतदारसंघात आहे. महाविकास आघाडीचा विचार करत असतांना नक्कीच पक्षश्रेष्ठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विचार करेल. राजकीय डाव म्हणून पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला जातो. पण आता पुरस्कृत करण्याची गरज नाही असे देखील सुनील शेळके यांनी स्पष्ट केले आहे.
Read also
- “राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरू निवड समित्या जाहीर “
- “पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे भाजपला आता कसे सुचले”, शरद पवारांचा भाजपला सवाल
- “लबाड बोका ढोंग करतोय”; कळव्यात राष्ट्रवादी अन् शिंदे गटामध्ये जोरदार बॅनरबाजी..!
- “महागाई, चिनी सैन्याची घुसखोरी, BBC डॉक्युमेंट्री, हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी,”, मोदींचा शेवटचा बजेट गाजणार
- संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई करणार का ?