मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कार्यालयचं बांधकाम पडण्यात आल्यानंतर हा वाद आणखी तीव्र झाला आहे. बांद्रा येथील म्हाडा वसाहतीमध्येच अनिल परब यांच्या कार्यालयावरून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच त्याच ठिकाणी अनिल परब यांनी पत्रकार परिषदे घेऊन भाजप नेते किरीट सोमय्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे.
“लबाड बोका ढोंग करतोय”; कळव्यात राष्ट्रवादी अन् शिंदे गटामध्ये जोरदार बॅनरबाजी..!
म्हाडा येथील कार्यालय पाडण्याचा मागे किरीट सोमय्यांचा मोठा हात आहे. त्यांना मराठी माणसांना मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांच्याच सांगण्यावरून हा सगळा प्रकार सुरू झाला आहे. त्यांनी अनेक बिल्डरांना यासाठी सुपाऱ्या दिल्या आहेत. त्यांच्यात हिमंत असेल त्यांनी याठिकाणी यावे, आम्ही त्यांचं स्वागत करू. अन् या प्रकरणाचा जे काही आहे. त्याचा साक्षमोक्ष एकदा लावून टाकू. असा इशारा अनिल परब यांनी सोमय्यांना दिला आहे.
म्हाडाच्या 56 वसाहती असून त्या पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. त्यात अशा प्रकारची ऑर्डर येणं आणि लोकांना मुळ घरं 220 स्क्वेअर फुटचीच घरं द्यायची या हेतून किरीट सोमय्यांना बिल्डर्संकडून सुपारी घेतली असावी. त्यांच्यावर किरीट सोमय्यांनी दबाव टाकला आहे. त्यानंतर या जागा इमारतीने स्वत:हून मोकळ्या केल्या. गरीब मराठी माणूस या विभागात राहतो. त्यांची ही जागा आहे. ही जागा सोसायटीची आहे. असंही अनिल परब यांनी सांगितले.
संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई करणार का ?
दरम्यान, या प्रकरणावरून राज्यात शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बघायला मिळत आहे. त्यांनी थेट किरीट सोमय्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. त्याआधी या इमारतीचं बांधकाम पाडण्यानंतर सोमय्या त्याकडे रवाना झाले. मात्र मध्येच पोलिसांनी सोमय्यांची गाडी अडवून त्यांना परत पाठवले. त्यात पुन्हा एकदा अनिल परब आणि सोमय्या वाद चव्हाट्यावर आला आहे.
Read also
- सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर…! चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
- “ठाण्यात शिंदेंकडून राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता, 15 ते 20 नगरसेवक बंडाळीच्या दिशेने”
- “लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हाच भाजपची पोटनिवडणुकीची तयारी”
- “राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरू निवड समित्या जाहीर “
- “पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे भाजपला आता कसे सुचले”, शरद पवारांचा भाजपला सवाल