नाशिक : राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती, आणि नागपुर याविभागात ही निवडणुक पार पडली. मात्र या सगळ्यांमधून नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघाची निवडणुक चर्चेची ठरली आहे. महाविकास आघाडीने शुंभागी पाटील यांना पाठिंबा दिला तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार डॉ. सत्यजीत तांबे यांना सत्ताधारी पक्षांनी आपला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला. यातच आता सत्यजीत तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार का ? अशी चर्चा रंगली आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केलं आहे.
नाशिकमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजीत तांबे यांना आपला पाठिंबा द्यायचा की नाही, हे त्यांनी ठरवावं. त्यांना माझा ना नसणार आहे. त्यातच आमची मतं ही महाविकास आघाडीला कधीच जाणार नाहीत. हे मी आधीच सांगितलं होतं. त्यामुळे आमची सगळी मतं ही अपक्ष उमेदवारांना गेलीत. असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला अप्रत्यक्ष पाठिंबा सत्यजीत तांबेंना दिल्याचं त्यांनी नमुद केलं.
संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई करणार का ?
सत्यजीत तांबे यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे निकालही चांगलाच लागणार आहे. त्यातच सत्यजीत तांबे भाजपमध्ये आलेच तर त्यांचं आम्ही त्यांचं स्वागतच करू. असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजीत तांबे यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली. त्याआधी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील नगरमध्ये सत्यजीत तांबे यांना भाजपमध्ये खुली ऑफर दिली होती. त्यावर सत्यजीत तांबे यांनी ती ऑफर धुडकावून लावली आहे.
Read also
- “ठाण्यात शिंदेंकडून राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता, 15 ते 20 नगरसेवक बंडाळीच्या दिशेने”
- “लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हाच भाजपची पोटनिवडणुकीची तयारी”
- “राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरू निवड समित्या जाहीर “
- “पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे भाजपला आता कसे सुचले”, शरद पवारांचा भाजपला सवाल
- “लबाड बोका ढोंग करतोय”; कळव्यात राष्ट्रवादी अन् शिंदे गटामध्ये जोरदार बॅनरबाजी..!