पुणे : चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीची सध्या राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीवरून मोठी खलबतं सुरू झाली आहे. भाजपकडून कुटुंबीयातीलच सदस्यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत उमेदवारीवरून चढाओढ सुरू झाली आहे. यातच पिंपरी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे राष्ट्रवादीत बंड करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी एकाच गाडीत प्रवास केल्याने चर्चांना उधान आलं आहे.
“लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हा..;” शेळकेंच्या आरोपांवर लांडगेंचं प्रत्यु्त्तर
काही दिवसांपासून अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात बिनसलं होतं. पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पुढचं तिकीट दुसऱ्या उमेदवारा दिले जाणार आहे. अशी चर्चा आहे. अण्णा बनसोडे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अत्यंविधीवेळी देखील ते मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे शिंदे गटात गेले तर उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे अण्णा बनसोडे शिंदे गटात जातील, अशी चर्चा रंगली आहे.
सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर…! चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
पिंपरी मतदार संघात अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत. 2009 ते 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक ते आमदार असा अण्णा बनसोडे यांचा प्रवास राहिला आहे. या काळात बनसोडे यांच्यात दरी निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. हीच शक्यता गृहीत धरून बनसोडे राष्ट्रवादीत बंड करण्याच्या तयारीत आहेत. अशी चर्चा सध्या राष्ट्रवादीत रंगली आहे.
Read also
- “सरकारी कंपन्या विकण्यावर केंद्र भर देणार नाही ही बजेटमधून अपेक्षा”, रोहित पवारांचा मोदींना टोला
- “थोडा थांबा..! लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”; बच्चू कडूंचा आशावाद
- “रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे”, सदाभाऊंचा रोहित पवारांना टोला
- “भाजपने पाळलेला वळू म्हणजे किरीट सोमय्या;” अनिल परबांचा सोमय्यांवर हल्लाबोल
- सकाळी आंदोलन, दुपारी लगेचच निर्णय..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या निर्णयांचा धडका