पुणे : राज्यात मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काही तासातच यश आलं आहे. एमपीएसी परिक्षेच्या नवीन पॅटर्न हा 2025 पासून लागू करावा, यासाठी पुण्यात स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक पुकारली. या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यु पवार यांनी देखील सहभाग घेतला. त्यावर लगचेच तोडगा काढून हे नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात येण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. तसेच आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले.
“राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरू निवड समित्या जाहीर “
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून दर्जा देण्यात आला आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत अंगिकारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर खाजगी कायम विनाअनुदानिक शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असलेली शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना अभिमत विद्यापीठांकरीता लागू करण्याचा निर्यण घेण्यात आला आहे.
“पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे भाजपला आता कसे सुचले”, शरद पवारांचा भाजपला सवाल
राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर १२ नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या ५० व्या बैठकीतील शिफारशीनुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यास मान्यता दिली आहे. यातून आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच सन २०२२ च्या तेंदू हंगामापासून पुढे तेंदू पाने संकलनाव्दारे जमा होणाऱ्या संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची वजाती न करता संबंधित तेंदू पाने संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहनात्मक मजुरी म्हणून देण्यात आलं आहे.
“लबाड बोका ढोंग करतोय”; कळव्यात राष्ट्रवादी अन् शिंदे गटामध्ये जोरदार बॅनरबाजी..!
महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणुक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, २०२२ या विधेयकाचा मसुदा सादर करण्यास मान्यता देण्यात आल्या आहेत. परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होणार असून यंत्रणेची जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टी.सी.एस., आयओएन व आय.बी.पी.एस. या कंपन्यांकडून घेताना उमेदवारांकडून आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहेत. तसेच राज्यात दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याकरीता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमधील प्रति दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ. गाईसाठी ७० हजार रुपये, म्हशीसाठी ८० हजार रुपये देण्यात आले आहे.
फलटण-पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच परिसरातील रेल्वे जाळे सक्षम होणार आहे. तर महिला व बाल विकास विभागाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत परिपोषण अनुदानात १हजार २२५ वरुन २५०० रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यातील निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास ३९७६ कोटी ८३ लाख रुपयांच्या तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस अवर्षण प्रवण भागात १० हजार ९७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेस ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे पुणे जिल्ह्यातील अवर्षण प्रवण भागातील ६३ गावात २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार. नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या वापर प्रयोजनाविषयी निर्णय. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्था देखील येणार. ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख रोजगाराची निर्मिती. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. ही योजना केवळ जिल्हा, व राज्यस्तरावरुन न राबविता सामाजिक न्याय विभागाच्या ‘अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सुधारणा योजना’ पूर्वीची ‘दलित वस्ती सुधार योजना’ व..भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ या योजनांप्रमाणे राज्यस्तर व जिल्हास्तर अशा दोन्ही स्तरांवर राबविण्यात येणार. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. अग्निसुरक्षा विषयक तरतुदींच्या अनुषंगाने सुधारणा. शैक्षणिक इमारतींची उंची ३० मीटर वरुन ४५ मीटर करणे, फायर ऑडिटर/ सल्लागार नेमणूकीची तरतूद करण्यात आले आहे.
Read also
- “लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हा..;” शेळकेंच्या आरोपांवर लांडगेंचं प्रत्यु्त्तर
- “हिमंत असेल तर ये इथे”; अनिल परब किरीट सोमय्यांवर भडकले
- सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर…! चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
- “ठाण्यात शिंदेंकडून राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता, 15 ते 20 नगरसेवक बंडाळीच्या दिशेने”
- “लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हाच भाजपची पोटनिवडणुकीची तयारी”