पुणे : राज्यसेवा मुख्य परिक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावी या मागणीसाठी आज स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं. अलका टॉकीज याठिकाणी येथे झालेल्या आंदोलनात भाजप नेते गोपीचंद पडळकर, अभिमन्यु पवार, सदाभाऊ खोत उपस्थित होते. भाजपचे नेते फक्त प्रसिद्धीकरीत आंदोलनात सहभागी झाले होते. अशी टिका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. त्यावर रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“ठाण्यात शिंदेंकडून राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता, 15 ते 20 नगरसेवक बंडाळीच्या दिशेने”
रोहित पवार हे महान नेते आहेत. महान नेत्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या मुलांने काय बोलावे. त्यांच्याच सरकारच्या काळात एवढे चांगले निर्णय घेतले की, विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो असून हे सरकार विद्यार्थ्यांच्या बाजून निर्णय घेईल. तसेच रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. अशी टिका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
“लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हाच भाजपची पोटनिवडणुकीची तयारी”
त्याआधी रोहित पवार यांनी यावर एक ट्विट केलं आहे. एमपीएसची साठी वर्णनात्मक परीक्षा पद्धत 2015 नंतर लागू करण्याच्या मागणीसाठी परीक्षार्थी आंदोलन करत आहेत. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही मागणी त्वरीत मान्य करून हा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यासाठी निर्णय घेण्यात आला.
Read also
- “भाजपने पाळलेला वळू म्हणजे किरीट सोमय्या;” अनिल परबांचा सोमय्यांवर हल्लाबोल
- सकाळी आंदोलन, दुपारी लगेचच निर्णय..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या निर्णयांचा धडका
- “लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हा..;” शेळकेंच्या आरोपांवर लांडगेंचं प्रत्यु्त्तर
- “हिमंत असेल तर ये इथे”; अनिल परब किरीट सोमय्यांवर भडकले
- सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर…! चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य