पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील शेवटचा बजेट सादर केला आहे. या अर्थसंकल्पात निर्मला सितारमण यांनी सप्तऋषींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र देशातील मागील काही वर्षापासून महागाई, बेरोजगारीवरून मोदींवर विरोधकांनी हल्लाबोल केला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी मोदींवर टिका केली आहे.
“रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे”, सदाभाऊंचा रोहित पवारांना टोला
आज सादर होणारे मोदी सरकारचे शेवटचे बजेट सादर केला आहे. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये जनतेला महागाई, बेरोजगारीपासून दिलासा नाहीच उलट आश्वासन, घोषणा, भुलथापा देऊन 2023 ची लोकसभा जिंकण्याचा मोदींचा डाव आहे. असं रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे. यातच आगामी काळात कर्नाटकात विधानसभेची निवडणुक होत आहे. त्यामुळे कर्नाटकसाठी केंद्र सरकारने मोठी तरतुद केली आहे.
“भाजपने पाळलेला वळू म्हणजे किरीट सोमय्या;” अनिल परबांचा सोमय्यांवर हल्लाबोल
केंद्रीय अर्थसंकल्पात यावेळी 7 म्हणजे सप्तऋर्षींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात सर्वसमावेश विकास, अंत्योदयापर्यंत पोहोच, पायाभुत सुविधा आणि गुंतवणुक, क्षमतेची वाढ, हरीत विकास, युवा ऊर्जा, आणि आर्थिक क्षेत्र यावर भर देण्यात आला आहे. उद्योगपती गौतम अडाणी यांच्यामुळे बाजार खाली कोसळला होता. परंतु अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदर सकाळपासून बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत 60 हजारांच्या खाली आलेला सेसेंक्स थोड्यावेळापुर्वी 60 हजारांच्या वर गेला. अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये जवळपास 500 अंकाची वाढ झाली आहे.
सकाळी आंदोलन, दुपारी लगेचच निर्णय..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या निर्णयांचा धडका
देशात लवकरच 5 जी सेवांचा वापर करणारे अॅल्पिकेशन तयार करण्यासाठी देशभरातल्या इंजिनिअरिंग संस्थांमध्ये 100 लॅब्ज उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ई कोर्टसच्या तिसऱ्या टप्प्याची सुरूवात केली जाणार आहे. त्यासाठी 7 हजार कोटींची तरतुद करण्यात आल्याची माहिती निर्मला सितारमण यांनी दिली.
आज सादर होणारे मोदी सरकारचे शेवटचे बजेट असणार आहे. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये जनतेला महागाई,बेरोजगारी पासून दिलासा नाहीच उलट आश्वासन,घोषणा,भूलथापा देऊन 2023 ची लोकसभा जिंकण्याचा मोदींचा डाव आहे.@BJP4India @narendramodi #BudgetSession2023
— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) February 1, 2023
Read also
- मोदींच्या शेवटच्या बजेटमधील कररचनेत मोठे बदल, 7 लाखांपर्यंत कर सवलत
- “बजेट सुरू असताना मोदी मोदीचा जय जय, दुसरीकडे विरोधकांकडून भारत जोडो च्या घोषणा”
- “राष्ट्रवादीचा आमदार बंड करण्याच्या तयारीत, शिंदेंच्या भेटीने राष्ट्रवादीत खळबळ”
- “सरकारी कंपन्या विकण्यावर केंद्र भर देणार नाही ही बजेटमधून अपेक्षा”, रोहित पवारांचा मोदींना टोला
- “थोडा थांबा..! लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”; बच्चू कडूंचा आशावाद