नाशिक : राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. पाच विभागामध्ये झालेल्या या निवडणुकीत नाशिकमधील पदवीधर मतदार संघाची निवडणुक चर्चेची ठरली होती. यात काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी बंडाळी केल्याने अपक्ष म्हणून डॉ. सत्यजीत तांबे यांनी अर्ज सादर केला. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध महाविकास आघाडीने शुंभागी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.
हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवर..! मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या बॅंकवर ईडीचा छापा
नाशिकमध्ये थेट लढत ही अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे विरूद्ध शुंभागी पाटील अशी होणार आहे. तांबे पिता पुत्र यांनी काॅंग्रेसविरूद्ध बंडाळी केल्याने त्यांच्यावर पक्षांनी निलंबणाची कारवाई केली. त्यानंतर शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून शुंभागी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. तर दुसरीकडे भाजपने सत्यजीत तांबे यांना आपला पाठिंबा जाहीर केला नाही. परंतु सत्यजीत तांबे यांना भाजपने अप्रत्यक्ष पाठिंबा दिला.
“कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा रंगला कट्टा”, सर्वपक्षीय नेत्यांचा मतदारसंघावर दावा
नाशिक पदवीधर संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली आहे. आज सकाळी मत पेट्या उघडल्या असून त्यातील वैध आणि अवैध मतांची छाननी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पोस्टल मतं देखील बाजूला काढून त्याची छाननी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली असून आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.
कसबा पेठ विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीचीच..! इच्छुक उमेदवारांची नावं जाहीर
दरम्यान, नाशिक विभागात एकूण 2 लाख 62 हजार 731 मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदार अहमदनगर जिल्ह्यात असून ही संख्या 1 लाख 15 हजार 638 मतदार आहेत. तर नाशिक जिल्ह्यात 69 हजार 652, जळगाव जिल्हायत 35 हजार 58, धुळे जिल्ह्यात 23 हजार 412, नंदुरबार जिल्ह्यात 18 हजार 971 इतके मतदार होते. तर 338 मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान झालं आहे.
Read also
- “आकड्यांचा खेळ अन् गुलाबी स्वप्ने यापलिकडे अर्थसंकल्पात काही नाही”, नाना पटोले
- फसवा अन् चुनावी जुमला असलेला हा अर्थसंकल्प”; पवारांची केंद्र सरकारवर जोरदार टिका
- फसवा अन् चुनावी जुमला असलेला हा अर्थसंकल्प”; पवारांची केंद्र सरकारवर जोरदार टिका
- “केंद्र सरकार माझ्यावर टपून बसलाय, मला केव्हाही अटक करून तुरूंगात टाकतील”; आव्हाडांचा खळबळजनक दावा
- उमेदवारांच्या याद्या, तयारीही जोरात, फक्त राज ठाकरेंचा आदेश..! कसबा पेठ पोटनिवडणुकीत मनसे मैदानात