पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुक ही मनसेने लढवली पाहिजे, अशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी अनेक पदाधिकारी ही निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ही मागणी कोअर कमिठीसमोर ठेवली आहे. ही समिती राज ठाकरे यांच्याशी बोलून घेणार आहे. त्यासाठी आमची सगळी तयारी सुरू आहे. असं मनसेचे पुणे शहाराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले आहे.
“महागाई, बेरोजगारीपासून दिलासा नाहीच, उलट घोषणा, आश्वासन देऊन निवडणुका जिंकण्याचा डाव”
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. यातच या पोटनिवडणुकीसाठी अलिकडेच मनसेचही बैठक पार पडली. या बैठकीत शहारातील अनेक मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते. तसेच ही पोटनिवडणुक मनसेनेही लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यासंदर्भात आम्ही राज ठाकरे यांच्याकडे मागणी करणार आहोत, असंही साईनाथ बाबर यांनी सांगितले आहे.
मोदींच्या शेवटच्या बजेटमधील कररचनेत मोठे बदल, 7 लाखांपर्यंत कर सवलत
2012 च्या महापालिका निवडणुकीत कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून जनतेने मनसेला मत दिलं होतं. त्याआधी 2009 सालीही जनतेने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. यातच मधल्या काळात राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिकेमुळे आम्हाला याठिकाणी फायद्याची ठरणार आहे. त्याठिकाणी अनेक प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. त्यामुळे जनता आमचा विचार करेल. असंही ते म्हणाले.
Read also
- हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवर..! मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या बॅंकवर ईडीचा छापा
- “कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा रंगला कट्टा”, सर्वपक्षीय नेत्यांचा मतदारसंघावर दावा
- कसबा पेठ विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीचीच..! इच्छुक उमेदवारांची नावं जाहीर
- “सुनील शेळकेंना भेटून, योग्य तो निर्णय घेऊ”, अजित पवारांचं शेळकेंबाबत मोठं वक्तव्य
- “आजच्या अर्थसंकल्पातून सामान्यांची ‘निर्मल’ आशा धुळीस मिळाली”; जितेंद्र आव्हाड