पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुक लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय पक्षांच्या बैठका पार पडणार असून यावर उमेदवारी निश्चितीवर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या बैठका पार पडणार असून मनसे, भाजप यांनी आपले उमेदवारांची यादी वरिष्ठांकडे पाठविली आहे.
“केंद्र सरकार माझ्यावर टपून बसलाय, मला केव्हाही अटक करून तुरूंगात टाकतील”; आव्हाडांचा खळबळजनक दावा
कसबा पेठ मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छुक उमेदवारांची बैठक होणार आहेत. पुण्यातून कसबा पेठ मतदार संघातून रूपाली पाटील, अंकुश काकडे, रविंद्र माळोदकर, वनराज्य अधिकारी, अण्णासाहेब थोरात अशी नावं समोर आली आहे. या इच्छुक उमेदवारांवर आज राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तेब करण्याची शक्यता आहे.
उमेदवारांच्या याद्या, तयारीही जोरात, फक्त राज ठाकरेंचा आदेश..! कसबा पेठ पोटनिवडणुकीत मनसे मैदानात
तर दुसरीकडे काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडणार आहे. ही बैठक मुंबई पार पडणार असून कुणाला उमेदवारी देण्यात येईल त्याकडे लक्ष्य लागून राहिलं आहे. या पोटनिवडणुकीकरीता रविंद्र धनंगेकर, अरविंद शिंदे इत्यादी काॅंग्रेसचे नेते इच्छुक आहेत. तर मनसेच्या इच्छुक चौघांची नावे राज ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये गणेश सातपुते, अजय शिंदे, निलेश हंडे, आणि गणेश भोकरे अशी नावं पाठवण्यात आली आहे.
हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवर..! मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या बॅंकवर ईडीचा छापा
दरम्यान, मुक्ता टिळक यांचे पती शैलश टिळक यांचे नाव भाजपकडून चर्चेत आले आहे. त्याचबरोबर गणेश बीडकर, हेमंत रासने यांच्यासह एकूण पाच जणांची नावे भाजपच्या निवडणुक समितीकडे पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात या पोटनिवडणुकांसाठी आपले उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.
Read also
- नागपुरमध्ये नागो गाणार विरूद्ध सुधाकर आडबाले…! गुलाल कोण उधळणार ?
- “नाशिकमध्ये शुंभागी पाटील विरूद्ध सत्यजीत तांबे, कोण बाजी मारणार ?” आज फैसला
- “आकड्यांचा खेळ अन् गुलाबी स्वप्ने यापलिकडे अर्थसंकल्पात काही नाही”, नाना पटोले
- फसवा अन् चुनावी जुमला असलेला हा अर्थसंकल्प”; पवारांची केंद्र सरकारवर जोरदार टिका
- फसवा अन् चुनावी जुमला असलेला हा अर्थसंकल्प”; पवारांची केंद्र सरकारवर जोरदार टिका