औरंगाबाद : शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार नाहीत. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच म्हटलं आहे. त्याचाच उलटा परिणाम आज औरंगाबाद शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या मत पत्रिकावर उमेदवारांनी नो पेन्शन नो वोट असा उल्लेख आढळून आला आहे. सकाळी वैध आणि अवैध मतांची छाननी करण्यात आली. त्यात अवैध ठरलेल्या मतांच्या पत्रिकेवर नो पेन्शन नो वोट असा उल्लेख आढळून आला आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी..! उमेदवारीसाठी आज बैठकांचा सत्र
मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विक्रम काळे सहा हजा मतांनी आघाडीवर आहेत. विक्रम काळे यांना पहिल्या पसंतीची 19 हजार 768 मते मिळाली आहे. तर किरण पाटील यांना 13 हजार 2347 मते मिळाली आहे. मराठवाडा शिक्षक संघाचे सुर्यकांत विश्वासराव यांनी देखील महत्वाची मतं मिळवत प्रमुख उमेदवारांना धक्का दिल्याचे समोर आले आहेत.
नागपुरमध्ये नागो गाणार विरूद्ध सुधाकर आडबाले…! गुलाल कोण उधळणार ?
औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर आहेत. त्याठिकाणी भाजपने पाठिंबा दिलेले किरण पाटील यांंना 13247 मतं पडली आहेत. तर विक्रम काळे यांना 19767 मतं मिळवून ते आघाडीवर आहेत. या दोन्हींमध्ये जवळपास सहा हजार पेक्षा अधिक मतांचा फरक आहे. त्यामुळे औरंगाबाद शिक्षक मतदार संघाची जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे.
“नाशिकमध्ये शुंभागी पाटील विरूद्ध सत्यजीत तांबे, कोण बाजी मारणार ?” आज फैसला
दुसरीकडे अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. भाजपने पाठिंबा दिलेले रणजीत पाटील सध्या पिछाडीवर गेले आहेत. तर नागपुर येथील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधारकर आडबाले यांना आतापर्यंत 13 हजार मतं मिळाली असून 7 हजार मतांनी ते आघाडीवर राहिले आहेत. नागपुर शिक्षक मतदार संघातील विद्यामान आमदार नागो गाणार यांचा पराभव याठिकाणी निश्चित मानला जात आहे.
Read also
- “कर्नाटकला पैसे दिले मग महाराष्ट्राने काय पाप केलं”, अजित पवारांचा केंद्र सरकारवर संताप
- औरंगाबादमधून विक्रम काळे आघाडीवर, भाजपला औरंगाबादमध्ये धक्का बसणार
- नागपुर, औरंगाबाद, अन् अमरावतीत भाजपला जोरदार धक्का, सगळेच उमेदवार पिछाडीवर
- विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने खातं उघडलं, विद्यमान आमदाराचा झाला पराभव
- पाटील महादेवाच्या दर्शनासाठी, सत्यजीत तांबे अज्ञात स्थळी, नाशिकच्या निवडणुकीत रंगत