नागपुर : राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने कोकण शिक्षक मतदार संघातून विजय मिळवला आहे. परंतु औरंगाबाद, अमरावती आणि नागपुर याठिकाणी भाजपा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या तिन्ही विभागात भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार आतापर्यंत पिछाडीवर गेले आहेत. त्यामुळे या विभागात भाजपचा पराभव आता निश्चित मानला जात आहे.
“आकड्यांचा खेळ अन् गुलाबी स्वप्ने यापलिकडे अर्थसंकल्पात काही नाही”, नाना पटोले
औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर आहेत. त्याठिकाणी भाजपने पाठिंबा दिलेले किरण पाटील यांंना 13247 मतं पडली आहेत. तर विक्रम काळे यांना 19767 मतं मिळवून ते आघाडीवर आहेत. या दोन्हींमध्ये जवळपास सहा हजार पेक्षा अधिक मतांचा फरक आहे. त्यामुळे औरंगाबाद शिक्षक मतदार संघाची जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे.
फसवा अन् चुनावी जुमला असलेला हा अर्थसंकल्प”; पवारांची केंद्र सरकारवर जोरदार टिका
दुसरीकडे अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. भाजपने पाठिंबा दिलेले रणजीत पाटील सध्या पिछाडीवर गेले आहेत. तर नागपुर येथील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधारकर आडबाले यांना आतापर्यंत 13 हजार मतं मिळाली असून 7 हजार मतांनी ते आघाडीवर राहिले आहेत. नागपुर शिक्षक मतदार संघातील विद्यामान आमदार नागो गाणार यांचा पराभव याठिकाणी निश्चित मानला जात आहे.
फसवा अन् चुनावी जुमला असलेला हा अर्थसंकल्प”; पवारांची केंद्र सरकारवर जोरदार टिका
दरम्यान, कोकण शिक्षण मतदार संघात झालेल्या निवडणुकीत। शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला होता. परंतु त्यांचा याठिकाणी पराभव झाला आहे. त्यांना या निवडणुकीत 9768 मत पडलीत. तर विजयी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20648 मत मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे हे सुरूवातीला शिवसेनेकडे होते. मात्र निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करून निवडणुक लढविली.
Read also
- विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने खातं उघडलं, विद्यमान आमदाराचा झाला पराभव
- पाटील महादेवाच्या दर्शनासाठी, सत्यजीत तांबे अज्ञात स्थळी, नाशिकच्या निवडणुकीत रंगत
- कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी..! उमेदवारीसाठी आज बैठकांचा सत्र
- नागपुरमध्ये नागो गाणार विरूद्ध सुधाकर आडबाले…! गुलाल कोण उधळणार ?
- “नाशिकमध्ये शुंभागी पाटील विरूद्ध सत्यजीत तांबे, कोण बाजी मारणार ?” आज फैसला