नागपुर : नागपुर शिक्षक मतदार संघात सुरूवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले आघाडीवर राहिले. त्यांना आतापर्यंत 16500 मत मिळवून विजयी झालेत. तर त्यांच्याविरोधात विद्यमान आमदार नागो गाणार यांना फक्त 6366 मत मिळालीत. नागो गाणार यांना भाजपने पाठिंबा दिला होता. यातच भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका दिल्याचं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्याला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
फडणवीसांच्या नागपुरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी
नागपुरची जागा आम्ही कधीच लढत नाही. ती शिक्षक परिषद लढते आहे. भाजपने केवळ पाठिंबा दिला. भाजपचा उमेदवार नव्हता. नाना पटोले या निकालाने हुरळून गेले. या विजयातून कुणाचे नुकसान झाले नाही. आम्ही शिक्षक परिषदेला पुर्ण मतद केली. यामुळे हुरळून जाऊ नये. कोकणमध्ये आम्ही जिंकलो आहोत. या निकालातून आत्मपरिक्षण करावे असे काही नाही. भाजपने जी काही मदत करायची होती ती केली. नागपुर भाजप लढले असते तर तीही जिंंकली असती. असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर कसब्यातून शैलेश टिळकांनी अर्ज घेतला, पोटनिवडणुकीची रंगत वाढणार
नागपुर विधानसभा हा भाजपचा यांचा बालेकिल्ला समजला जात आहे. नागपुरमधून देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी असे भाजपचे दिग्गज नेते प्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत. यातच भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार नागो गाणार यांचा पराभव झाला आहे. त्यावरून नागपुरकर गाणार, आज कमळाबाई जाणार, बावन कुळांचा उद्धार , काही दिवसात होणार, असं म्हणत संघाच्या बागेत देवेंद्र जी दरी,नितीन जी ठरतील का भावी गड करी. असं म्हमण मिटकरी यांनी डिवचलं आहे.
“पदवीधर, शिक्षक निवडणुकीत नो पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन”, थेट मतपत्रिकांवर उल्लेख
नागपुर शिक्षक मतदार संघात सुरूवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले आघाडीवर राहिले. त्यांना आतापर्यंत 16500 मत मिळवून विजयी झालेत. तर त्यांच्याविरोधात विद्यमान आमदार नागो गाणार यांना फक्त 6366 मत मिळालीत. नागो गाणार यांना भाजपने पाठिंबा दिला होता. यातच भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका दिल्याचं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
Read also
- “..तर सत्यजीत तांबेंसाठी काॅंग्रेसमध्ये परतीचे दरवाजे उघड,” काॅंग्रेसकडून तांबेंबाबत मोठा निर्णय
- “नागपुरकर गाणार, आज कमळाबाई जाणार”, राष्ट्रवादीने गडकरीचंही नावं घेत भाजपला डिवचलं
- “शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणुकीत कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर ” वाचा सविस्तर..
- अमरावतीमध्ये भाजप अन् आघाडीमध्ये काट्टे की टक्कर, फक्त 680 मतांची आघाडी
- “दया कुछ तो गडबड है..! फडणवीसांची जादू सगळीकडे चालली, पण नागपुरात का नाही?”