नाशिक : राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरीता आज मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकांमध्ये नाशिक पदवीधर निवडणुक चांगलीच चर्चेची ठरली आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉ. सत्यजीत तांबे आघाडीवर आहेत. तर शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुंभागी पाटील पिछाडीवर गेल्या आहेत.
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर कसब्यातून शैलेश टिळकांनी अर्ज घेतला, पोटनिवडणुकीची रंगत वाढणार
नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजीत तांबे यांना आतापर्यंत 15784 मत मिळाली आहेत. तर दुसरीकडे शुंभागी पाटील यांना 7862 मत मिळाली आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये मोठा फरक असल्याने या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात 1 लाखांपेक्षा अधिक मतदारांनी मतदान केलं आहे. त्यामुळे याठिकाणी मतप्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“पदवीधर, शिक्षक निवडणुकीत नो पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन”, थेट मतपत्रिकांवर उल्लेख
तर दुसरीकडे त्याठिकाणी सत्यजीत तांबेंच विजयी होणार आहेत. ते निवडून आले तर योग्य ते निर्णय घेतील. असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर सत्यजीत तांबे निवडून आले तर त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडायचे की नाही? यावर हायकमांड निर्णय घेईल. असं म्हणत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना प पटोले यांनी सत्यजीत तांबेंना पुन्हा पक्षात घेण्याचं संकेत दिले आहेत.
“कर्नाटकला पैसे दिले मग महाराष्ट्राने काय पाप केलं”, अजित पवारांचा केंद्र सरकारवर संताप
दरम्यान, नागपुर शिक्षक मतदार संघात सुरूवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले आघाडीवर राहिले. त्यांना आतापर्यंत 16500 मत मिळवून विजयी झालेत. तर त्यांच्याविरोधात विद्यमान आमदार नागो गाणार यांना फक्त 6366 मत मिळालीत. नागो गाणार यांना भाजपने पाठिंबा दिला होता. नागपुरात फक्त ३ उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यासाठी आवश्यक ३ हजार ४०८ मतं मिळवता आली आहेत. त्यात मविआचे सुधाकर आडबाले आणि भाजपाचे नागो गाणार यांचा समावेश आहे. त्यामुळे उरलेल्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.
Read also
- “नागपुरकर गाणार, आज कमळाबाई जाणार”, राष्ट्रवादीने गडकरीचंही नावं घेत भाजपला डिवचलं
- “शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणुकीत कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर ” वाचा सविस्तर..
- अमरावतीमध्ये भाजप अन् आघाडीमध्ये काट्टे की टक्कर, फक्त 680 मतांची आघाडी
- “दया कुछ तो गडबड है..! फडणवीसांची जादू सगळीकडे चालली, पण नागपुरात का नाही?”
- फडणवीसांच्या नागपुरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी