अमरावती : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या तीन जागांवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. कोकण शिक्षक मतदार संघावर भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. मात्र औरंगाबाद, नागपुर याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जोरदार टक्कर बघायला मिळत आहेत.
औरंगाबादमधून विक्रम काळे आघाडीवर, भाजपला औरंगाबादमध्ये धक्का बसणार
अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांना आतापर्यंत 11996 मत मिळाली असून त्यांनी 680 मतांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना 11312 मत पडली आहेत.
नागपुर, औरंगाबाद, अन् अमरावतीत भाजपला जोरदार धक्का, सगळेच उमेदवार पिछाडीवर
मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीत पहिल्या पंसतीच्या मतांमध्ये विक्रम काळे सहा हजार ५८९ मतांची आघाडी घेतली. पहिल्या पसंतीची मतमोजणी पुर्ण झाली असून विजयासाठीचा २५ हजार ३८६ मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. पहिल्या पसंतीचा कोटा पुर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील, त्यानंतरच निकाल जाहीर केला जाईल. एकूणच विक्रम काळे चौथ्यांदा विजयी होण्याच्या मार्गावर आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने खातं उघडलं, विद्यमान आमदाराचा झाला पराभव
दरम्यान, नागपुर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत सुधाकर आडबाले यांना १४ हजार ०६१ मत पडली आहेत. जवळपास त्यांनी ६ हजार ३०६ मतांनी आघाडी घेतली आहे. नागपुरचे विद्यमान आमदार आणि भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार नागो गाणार हे पिछाडीवर पडले आहेत. त्यांना फक्त ६३०९ मतं पडली आहेत. त्यामुळे भाजपला या मतदार संघात मोठा धक्का बसला आहे.
Read also
- “दया कुछ तो गडबड है..! फडणवीसांची जादू सगळीकडे चालली, पण नागपुरात का नाही?”
- फडणवीसांच्या नागपुरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी
- चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर कसब्यातून शैलेश टिळकांनी अर्ज घेतला, पोटनिवडणुकीची रंगत वाढणार
- “पदवीधर, शिक्षक निवडणुकीत नो पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन”, थेट मतपत्रिकांवर उल्लेख
- “कर्नाटकला पैसे दिले मग महाराष्ट्राने काय पाप केलं”, अजित पवारांचा केंद्र सरकारवर संताप