नाशिक : राज्याच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस बघायला मिळाली. सुरूवातीला कोकण शिक्षक मतदार संघावर भाजपने झेंडा फडकवला. परंतु त्यानंतर औरंगाबाद, नागपुर, आणि अमरावतीमध्ये भाजपला आघाडीने जोराचा धक्का दिला. यामध्ये नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि शुंभागी पाटील यांच्यात जोरदार लढत बघायला मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांना जुनी पेन्शन देता येणार नाही असं म्हटलं होतं. त्याचा उलट परिणाम भाजपवर झालेला दिसून आला. औरंगाबाद निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर नो पेन्शन नो वोट असा उल्लेख असलेल्या मतपत्रिका दिसून आल्या. त्यामुळे पेन्शनं या निवडणुकीत भाजपचं टेन्शन वाढवलेलं दिसून आलं.
“पदवीधर, शिक्षक निवडणुकीत नो पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन”, थेट मतपत्रिकांवर उल्लेख
कोकण शिक्षक मतदार संघात शिवसेनेतून आयात केलेले भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे विद्यामान आमदार आणि आघाडीने पाठिंबा दिलेले बाळाराम पाटलांवर विजय मिळवला. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20683 मत पडलीत तर बाळाराम पाटलांना 101997 मत पडल्याने त्यांना पराभवाचा सामाना करावा लागला. कोकण मतदार संघात भाजपने सत्ता आणि पैशाचा वापर केल्याची टिका त्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी केली.
औरंगाबादमधून विक्रम काळे आघाडीवर, भाजपला औरंगाबादमध्ये धक्का बसणार
नागपुर शिक्षक मतदार संघात सुरूवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले आघाडीवर राहिले. त्यांना आतापर्यंत 16500 मत मिळवून विजयी झालेत. तर त्यांच्याविरोधात विद्यमान आमदार नागो गाणार यांना फक्त 6366 मत मिळालीत. नागो गाणार यांना भाजपने पाठिंबा दिला होता. यातच भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका दिल्याचं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नागपुर, औरंगाबाद, अन् अमरावतीत भाजपला जोरदार धक्का, सगळेच उमेदवार पिछाडीवर
औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटलांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत आणि महाविकास आघाडीने विक्रम काळे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांना आतापर्यंत 20092 मत मिळाली असून ते आता विजयाच्या उंबरठ्यावर आले आहेत. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना 13497 मत मिळाली आहेत. ते अजूनही पिछाडीवर आले आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने खातं उघडलं, विद्यमान आमदाराचा झाला पराभव
अमरावतीमध्ये पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांना आतापर्यंत 11992 मत मिळाली असून त्यांनी 680 मतांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना 11312 मत पडली आहेत. त्यामुळे या निकालाकडेही सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान, या पाचही विभागात झालेल्या निवडणुकांमधून नाशिकची पदवीधर मतदार संघाची निवडणुक चर्चेची ठरली आहे. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आघाडीवर असून शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुंभागी पाटील सध्या पिछाडीवर आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीची मत मोजणी प्रक्रिया अजूनही सुरूच आहेत. रात्री उशिरापर्यंत याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
Read also
- “नागपुरची जागा भाजपने लढविली नाही, जर लढविली असती तर ती जिंकलीच असती”, चंद्रशेखर बावनकुळे
- अमरावतीमध्ये भाजप अन् आघाडीमध्ये काट्टे की टक्कर, फक्त 680 मतांची आघाडी
- “दया कुछ तो गडबड है..! फडणवीसांची जादू सगळीकडे चालली, पण नागपुरात का नाही?”
- फडणवीसांच्या नागपुरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी
- चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर कसब्यातून शैलेश टिळकांनी अर्ज घेतला, पोटनिवडणुकीची रंगत वाढणार