पुणे : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणुकीत नाशिकची पदवीधर निवडणुक जोरदार चर्चेची ठरली. यातच सत्यजीत तांबे नाशिकमध्येच विजयी होतील. तसेच ते पुढची भूमिका विचार करून घेतील. असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. त्यानंतर सत्यजीत तांबे यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीने मदत केली असं आरोप काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यावर आता काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंनी बाजी मारली..! दणक्यात विजय, 20 हजार पेक्षा अधिक मताची आघाडी
अजित पवार यांनीच आम्ही सत्यजीत तांबे यांना मदत केल्याचं वक्तव्य केलं आहे. कदाचित महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी शुंभागी पाटीलला मतदान केलं असतं. तर त्या निवडून आल्या असत्या. यासंदर्भात ज्यावेळी महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यावेळेस यावर चर्चा केली जाईल. असं नाना पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी कोणत्या अर्थाने हे वक्तव्य केलं आहे. ते त्यात समजेल असंही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन, आजच्या निवडणुक निकालांचा लेखाजोखा
काल झालेल्या मतमोजणीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना 68999 मतं मिळाली आहेत. तर शिवसेना पुरस्कृत आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुंभागी पाटील यांना 39534 मत पडली आहेत. त्यामुळे सर्वात जास्त ठरलेल्या या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली आहे. त्यावर सत्यजीत तांबे यांचं अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी कौतुक करत अभिनंदनही केलं आहे.
“नागपुरची जागा भाजपने लढविली नाही, जर लढविली असती तर ती जिंकलीच असती”, चंद्रशेखर बावनकुळे
दरम्यान, राज्याच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 3 भाजपला 1 आणि 1 जागा अपक्षाला मिळवण्यात यश आलं आहे. परंतु या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेची ठरलेली नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबेंनी विजयी गुलाल उधळला आहे. या पार्श्वभूमीवर विजयाची घोषणा झाल्यानंतर लगेचच नवनिर्वाचित विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु यावर आता सुधीर तांबे काय निर्णय घेणार. त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. तर नाशिकमध्ये सत्यजीत तांबेचं विजयी होणार. अन् ते योग्य ते निर्णय घेणार. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Read also
- पोटनिवडणुकांसाठी भाजपकडून आज उमेदवारांची घोषणा, हेमंत रासने, शंकर जगताप…
- तब्बल 48 तास उलटूनही मतमोजणी सुरूच, अमरवतीची निवडणुक चर्चेत, लिंगाडे आघाडीवर
- “संघर्षाच्या काळात संयम ठेऊन कसं जिंकता येतं हा सत्यजित तांबेंचा नवीन परिपाठ,”
- “नारायण राणेंना केंद्रातून लवकरच डच्चू मिळणार, केंद्रातल्या खात्यातलं त्यांना काहीच कळत नाही”
- सत्यजीत तांबेंचा अखेर विजय, पण मामा थोरातांनी बाळगलेले मौन चर्चेत, पुढची भूमिका स्पष्ट करणार