पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत भाजपसह, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसंग्राम सेना, रिपल्बिकन पार्टीचे शहाराध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची नावं वरिष्ठ पातळीवर पाठविली असून आज सांयकाळी या पोटनिवडणुकांसाठी उमेदवार घोषित केले जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन, आजच्या निवडणुक निकालांचा लेखाजोखा
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी कसबा पेठ आणि चिंचवडमधील इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी देखील केले आहेत. तसेच येत्या 6 डिसेंबरपर्यंत पोटनिवडणुकांसाठी अर्ज सादर कऱण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या पोटनिवडणुकांसाठी येत्या दोन ते तीन दिवसात आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
“नागपुरची जागा भाजपने लढविली नाही, जर लढविली असती तर ती जिंकलीच असती”, चंद्रशेखर बावनकुळे
दोन्ही पोटनिवडणुकांसाठी महायुतीतील सगळ्यांचं मत विचारत घेऊन उमेदवारांची नावं केंद्र पातळीवर पाठविली आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी येत्या सांयकाळपर्यंत उमेदवारांची नावं घोषित करण्यात येतील. असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. तसेच निवडणुक बिनविरोध करण्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांनी सर्व पक्षातील प्रमुखांना एक लेखी पत्र दिलं असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
अमरावतीमध्ये भाजप अन् आघाडीमध्ये काट्टे की टक्कर, फक्त 680 मतांची आघाडी
दरम्यान, भाजपकडून स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आणि स्विकृत सभाग्रह नेता गणेश बीडकर, धीरज घाटे यांच्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे. सुरूवातीला मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांचे नाव चर्चेत आले होते. परंतु सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत रासने यांचं नाव भाजपने कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी निश्चित केल्याचं समजत आहे. त्यामुळे याची घोषणा आज होणार आहे.
Read also
- तब्बल 48 तास उलटूनही मतमोजणी सुरूच, अमरवतीची निवडणुक चर्चेत, लिंगाडे आघाडीवर
- “संघर्षाच्या काळात संयम ठेऊन कसं जिंकता येतं हा सत्यजित तांबेंचा नवीन परिपाठ,”
- “नारायण राणेंना केंद्रातून लवकरच डच्चू मिळणार, केंद्रातल्या खात्यातलं त्यांना काहीच कळत नाही”
- सत्यजीत तांबेंचा अखेर विजय, पण मामा थोरातांनी बाळगलेले मौन चर्चेत, पुढची भूमिका स्पष्ट करणार
- अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंनी बाजी मारली..! दणक्यात विजय, 20 हजार पेक्षा अधिक मताची आघाडी