नाशिक : राज्याच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 3 भाजपला 1 आणि 1 जागा अपक्षाला मिळवण्यात यश आलं आहे. परंतु या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेची ठरलेली नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबेंनी विजयी गुलाल उधळला आहे. त्यांना 68,999 मत मिळालीत. तर यानिवडणुकीत शिवसेना पुरस्कृत आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुंभागी पाटलांचा पराभव झाला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सत्यजीत तांबेंचं कौतुक केलं आहे.
अमरावतीमध्ये भाजप अन् आघाडीमध्ये काट्टे की टक्कर, फक्त 680 मतांची आघाडी
नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी सुरू असतांना सत्यजीत तांबे नॉटरिचेबल होते. त्यामुळे चर्चांना उधान आलं होतं. परंतु रात्री उशिरा ते मीडियासमोर आलेत. अन् वस्तूस्थिती त्यांनी मांडली. यातच नाशिक जिल्हा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झाल्याने या निवडणुकीचा कोणताही विजयोत्सव साजरा करणार नसल्याचं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं. तसेच 3 ते 7 फेब्रवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
“दया कुछ तो गडबड है..! फडणवीसांची जादू सगळीकडे चालली, पण नागपुरात का नाही?”
सत्यजीत तांबेंच्या विजयाचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे. संघर्षाच्या काळात संयम ठेऊन कसं जिंकता येतं हा नवीन परिपाठ तसेच जवळचा मित्र गमावल्यानंतर आनंद उत्सव साजरा न करण्याचा आपला निर्णय हा नव्या पिढीसमोर आदर्श म्हणावा लागेल. असं कौतुक अमोल मिटकरी यांनी केलं आहे. तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन त्यांच्याविरूद्ध त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीने केला. परंतु, अपक्ष म्हणून निवडणुक लढवूनही अतिशय भरघोस मतांनी ते निवडून आले. म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांच्या नागपुरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काॅंग्रेसने एबी फॉर्म दिलेला असतानाही पक्षाला टाळून अपक्ष अर्ज भरणे ही सत्यजीत तांबे आणि सुधीर तांबे यांची कृती राज्यात काॅंग्रेसचा धाक जवळजवळ संपुष्टात आल्याचे लक्षण असून यासंदर्भात त्यांचे मामा बाळासाहेब थोरातांनी बाळगलेले कडकडीत मौन म्हणजे तांबे पिता-पुत्रांच्या भूमिकेला अप्रत्यक्षरित्या दिलेले समर्थनच मानले जात आहे.
@satyajeettambe ji
प्रथमत:आपले मनस्वी अभिनंदन.. संघर्षाच्या काळात संयम ठेवून कसं जिंकता येतं हा नवीन परिपाठ तसेच जवळचा मित्र गमावल्यानंतर आनंद उत्सव साजरा न करण्याचा आपला निर्णय हा नव्या पिढीसमोर आदर्श म्हणावा लागेल .#आपले हार्दिक अभिनंदन व मन:पुर्वक स्वागत welcome pic.twitter.com/trN7cuphjM— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 3, 2023
Read also
- “नारायण राणेंना केंद्रातून लवकरच डच्चू मिळणार, केंद्रातल्या खात्यातलं त्यांना काहीच कळत नाही”
- सत्यजीत तांबेंचा अखेर विजय, पण मामा थोरातांनी बाळगलेले मौन चर्चेत, पुढची भूमिका स्पष्ट करणार
- अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंनी बाजी मारली..! दणक्यात विजय, 20 हजार पेक्षा अधिक मताची आघाडी
- पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन, आजच्या निवडणुक निकालांचा लेखाजोखा
- “नागपुरची जागा भाजपने लढविली नाही, जर लढविली असती तर ती जिंकलीच असती”, चंद्रशेखर बावनकुळे