अमरावती : राज्याच्या पाच पैकी चार शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल हाती लागला आहे. परंतु या निवडणुकांमध्ये अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी दुसऱ्या दिवशीही सुरू असल्याने यामध्ये जोरदार रंगत आली आहे. मात्र या निवडणुकीत सुरूवातीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे आघाडीवर असून त्यांना आतापर्यंत 44, 448 मते मिळून आघाडीवर आहेत. त्यामुळे या निवडणुकीची चर्चा आता संपुर्ण राज्यभरात बघायला मिळत आहेत.
“नागपुरची जागा भाजपने लढविली नाही, जर लढविली असती तर ती जिंकलीच असती”, चंद्रशेखर बावनकुळे
बाद झालेली मत ही धीरज लिंगाडे यांना मिळाली असल्याचा दावा भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार रणजित पाटील यांनी केला होता. त्यानंतर या निवडणुकीची फेरमतमोजणी घेण्यात आली. त्यामध्ये धीरज लिंगाडे यांना बाद झालेली फक्त 30 तर रणजित पाटील यांना जवळपास 5000 ते 6000 मत मिळाली असल्याने त्यांनाच याचा फटका बसला आहे. रणजित पाटील यांना या निवडणुकीत आतापर्यंत 41, 896 मत पडली आहेत. त्यामुळे धीरज लिंगाडे सध्या रणजित पाटलांवर 2 हजार 552 मतांनी आघाडीवर असून त्यांचाच विजय निश्चित मानला जात आहे.
अमरावतीमध्ये भाजप अन् आघाडीमध्ये काट्टे की टक्कर, फक्त 680 मतांची आघाडी
धीरज लिंगाडे आणि रणजित पाटील यांच्यानंतर अनिल ओंकार अमलकार यांना 4, 256 तर अरूण रामराव सरनाईक यांना 1,576 मत, अॅड. आनंद रविंद्र राठोड यांना 402 , शरद प्रभाकर पाटील झांबरे यांना 460, डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी 1,734 अशी मतं पडली आहेत. तर .निलेश दिपकपंत पवार (राजे), श्री. लक्ष्मीकांत नारायण तडसे, श्री. धनराज किसनराव शेंडे, श्री. सुहास विठ्ठलराव ठाकरे, श्री. अनिल वकटुजी ठवरे, श्री. रणवीर संदेश गौतमराव, श्री. प्रविण डिगांबर बोंद्रे, श्री. विकेश गोकुलराव गवाले, श्री. पाटील उपेंद्र बाबाराव, श्री. ॲड. धनंजय मोहनराव तोटे, श्री. संदीप बाबुलाल मेश्राम, श्री. अनंतराव राघवजी चौधरी, श्रीमती माधुरी अरुणराव डाहारे, श्री. प्रजापती श्याम जगमोहन, श्री. डॉ. गौरव आर गवई, श्रीमती भारती ख. दाभाडे हे उमेदवार या निवडणुकीतून बाद झाले आहेत.
“दया कुछ तो गडबड है..! फडणवीसांची जादू सगळीकडे चालली, पण नागपुरात का नाही?”
दरम्यान, मतमोजणी केंद्रावर बाद झालेल्या मतांवर अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीची फेरमतमोजणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. तर ऊर्वरित चार मतदार संघात विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा आनंदउत्सोव साजरा केला आहे.
Read also
- “संघर्षाच्या काळात संयम ठेऊन कसं जिंकता येतं हा सत्यजित तांबेंचा नवीन परिपाठ,”
- “नारायण राणेंना केंद्रातून लवकरच डच्चू मिळणार, केंद्रातल्या खात्यातलं त्यांना काहीच कळत नाही”
- सत्यजीत तांबेंचा अखेर विजय, पण मामा थोरातांनी बाळगलेले मौन चर्चेत, पुढची भूमिका स्पष्ट करणार
- अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंनी बाजी मारली..! दणक्यात विजय, 20 हजार पेक्षा अधिक मताची आघाडी
- पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन, आजच्या निवडणुक निकालांचा लेखाजोखा