पुणे : राज्याच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 3 भाजपला 1 आणि 1 जागा अपक्षाला मिळवण्यात यश आलं आहे. परंतु या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेची ठरलेली नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबेंनी विजयी गुलाल उधळला आहे. तर नागपुर याठिकाणाची जागा ही महाविकास आघाडीला मिळाली आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
पोटनिवडणुकांसाठी भाजपकडून आज उमेदवारांची घोषणा, हेमंत रासने, शंकर जगताप…
अमोल मिटकरी यांनी ट्विटच्या आधारे भाजपवर टिका केली आहे. जागरूक मतदार, भाजप हद्दपार विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नव्या पिढीच्या जागरूक मतदारांनी व सुजान शिक्षकांनी भाजपला अक्षर:श लोळविले. खुनशी राजकारण, जातीयवादी विष, सामान्यांच्या प्रश्नावर जाणीवपुर्वक केलेले दुर्लक्ष, व अहंकाराला जागरूक मतदारांना जोरदार उत्तर दिलं आहे. अशी जोरदार टिका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
तब्बल 48 तास उलटूनही मतमोजणी सुरूच, अमरवतीची निवडणुक चर्चेत, लिंगाडे आघाडीवर
नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी सुरू असतांना सत्यजीत तांबे नॉटरिचेबल होते. त्यामुळे चर्चांना उधान आलं होतं. परंतु रात्री उशिरा ते मीडियासमोर आलेत. अन् वस्तूस्थिती त्यांनी मांडली. यातच नाशिक जिल्हा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झाल्याने या निवडणुकीचा कोणताही विजयोत्सव साजरा करणार नसल्याचं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं. तसेच 3 ते 7 फेब्रवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
“संघर्षाच्या काळात संयम ठेऊन कसं जिंकता येतं हा सत्यजित तांबेंचा नवीन परिपाठ,”
दरम्यान, नागपुर विधानसभा हा भाजपचा यांचा बालेकिल्ला समजला जात आहे. नागपुरमधून देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी असे भाजपचे दिग्गज नेते प्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत. यातच भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार नागो गाणार यांचा पराभव झाला आहे. त्यावरून नागपुरकर गाणार, आज कमळाबाई जाणार, बावन कुळांचा उद्धार , काही दिवसात होणार, असं म्हणत संघाच्या बागेत देवेंद्र जी दरी,नितीन जी ठरतील का भावी गड करी. असं म्हमण मिटकरी यांनी डिवचलं आहे.
जागरूक मतदार..
भाजपा हद्दपार…
विधान परिषद निवणुकीच्या निमित्ताने नव्या पिढीच्या जागरूक मतदारांनी व सुजान शिक्षकांनी भाजपाला अक्षरशः लोळविले.. खुनशी राजकारण, जातीयवादी विष, सामान्यांच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष, व अहंकाराला जागरूक मतदारांनी जोरदार उत्तर दिले.— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 3, 2023
Read also
- पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचं भाष्य..! म्हणाले की, “झालं गेलं गंगेला मिळालं, आता..”
- संजय राऊत अन् नारायण राणेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- तब्बल 30 तास मतमोजणी, अमरावतीमध्ये धीरज लिंगाडे विजयी, भाजपचा सुपडा साफ
- “…मग त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती?” राष्ट्रवादीकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर
- सत्यजीत तांबेंना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत ;” नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप