पुणे : चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. दिवंगत आमदारांच्या कुटुंबातच उमेदवारी देऊन ही निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. परंतु या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आपला उमेदवार मैदानात उतरणार असल्याची शक्यता पाहून भाजपने सावध पावलं टाकली आहेत. काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेले मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली आहे. त्यामुळे या भेटीत फडणवीसांनी टिळकांची समजूत काढली आहे की स्थान पक्के केले आहे? याची चर्चा सध्या सर्वदुर सुरू झाली आहे.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सुरूवातीपासून दोन्ही पोटनिवडणुकांकरीता कुटूंबातच उमेदवारी देण्याचं संकेत दिले. परंतु कसबा पेठ पोटनिवडणुकीत काॅंग्रेसने हालचाली सुरू केल्या असून जोरदार तयारीही केल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीसाठी काॅंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी आपला प्रचार प्रसार सुरूही केला आहे. हे सर्व परिस्थिती पाहता भाजप या निवडणुकांमध्ये गाफील राहणार नसून, भाजपही मोठी पावलं उचलणार असं चंद्रकांत पाटलांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे.
पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचं भाष्य..! म्हणाले की, “झालं गेलं गंगेला मिळालं, आता..”
काल देवेंद्र फडणवीस यांनी इच्छुक म्हणून असलेले शैलेश टिळक यांची पुण्यातील टिळकांच्या निवासस्थानी भेट घेतली. रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि शैलेश टिळक यांच्यात काही मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली आहे. फडणवीस यांच्या भेटीनंतर टिळक यांची समजूत घातली की, स्थान पक्के केेले? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. शैलेश टिळकांनी याआधीच आपण राजकारणात सक्रिय असून ही पोटनिवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं होतं.
संजय राऊत अन् नारायण राणेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अगोदर भाजपने टिळक कुटुंबीयातील कुणाल टिळक यांना प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुक टिळक कुटुबीयांना उमेदवारी मिळणार नसल्याचीही चर्चा दुसऱ्याबाजूला रंगली आहे. तर स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांच्या नावाची चर्चा सध्या भाजपच्या गोटातून सुरू झाली आहे. आज महाविकास आघाडी आणि भाजप आपला उमेदवार निश्चित करून त्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Read also
- कसबा पेठ पोटनिवडणुकीकरीता आघाडीचा उमेदवार ठरला…! बापटांना आव्हान देणाऱ्या नेत्याचं नाव निश्चित
- कसबा पेठ निवडणुक भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार
- पवार साहेब, उद्धव ठाकरे, पटोले अन् राज ठाकरे तुम्हालाही विनंती करतो की ही निवडणुक बिनविरोध व्हावी..;” बावनकुळे
- पवार साहेब, उद्धव ठाकरे, पटोले अन् राज ठाकरे तुम्हालाही विनंती करतो की ही निवडणुक बिनविरोध व्हावी..;” बावनकुळे
- पवार साहेब, उद्धव ठाकरे, पटोले अन् राज ठाकरे तुम्हालाही विनंती करतो की ही निवडणुक बिनविरोध व्हावी..;” बावनकुळे