पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर टिकास्त्र सोडलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या अजित पवारांच्या वक्तव्यावरून त्यांनी टिकास्त्र सोडलं आहे. यावेळी गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टिका केली.
कसबा पेठ निवडणुक भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार
अलिकडेच छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर संभाजी महाराज धर्मवीर नसते तर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असं म्हणणाऱ्यांची कदाचित सुंता झाली असती. त्यांना जर तसं वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे ? हे तपासावं. संभाजी महाराज धर्मवीर नसते तर परिस्थिती झाली असती की नसती? हे मला सांगा. असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या टिकेला राष्ट्रवादीचे युवाकार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन टिका केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्यापेक्षा माझा टॅमी स्वाभिमानी आहे. एकदा हाकलून लावल्यानंतर लवकर परत येत नाही. हाकलून लावल्यानंतरही पवार कुटुंब लक्ष द्यावं म्हणून किती धडपड असते. कीव येते. गोपीचंदच राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या मेहरबानीपेक्षा भुंकण्यामुळे टिकलं आहे. अशी टिका सुरज चव्हाण यांनी केली आहे.
गोपीचंद पडळकर यांच्यापेक्षा माझा”टॉमी”स्वाभिमानी आहे एकदा हाकलून लावल्यानंतर लवकर परत येत नाही.हाकलून लावल्यानंतरही पवारकुटुंब लक्ष दयावं म्हणून किती धडपड असते..कीव येते.गोपीचंदच राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या मेहरबानीपेक्षा पवारांवर भूंकण्यामुळे टिकलं आहे#लाथोंकेभूतबातोंसे..
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) February 4, 2023
Read also
- कसब्यात हेमंत रासने विरूद्ध रविंद्र धंगेकर..! आघाडीने कसब्याची जागा काॅंग्रेसला सोडली
- पोटनिवडणुकांसाठी भाजप अन् आघाडीकडून उमेदवार घोषीत…! आता थेट लढत होणार ?
- जगतापांना मागील वर्षापासून आव्हान देणारे राहुल कलाट्यांनी स्पष्ट केली भूमिका, निवडणुक लढणार, मग ती अपक्ष, की आघाडीकडून?
- “फडणवीस अन् टिळकांची रात्री बंद दाराआड चर्चा, ‘समजूत’ काढली की ‘स्थान’ पक्के केले ?” चर्चांना उधाण
- कसबा पेठ पोटनिवडणुकीकरीता आघाडीचा उमेदवार ठरला…! बापटांना आव्हान देणाऱ्या नेत्याचं नाव निश्चित