पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यासाठी भाजपकडून तीन वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला आहे. तर दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांना आपली उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी थेट लढत ही हेमंत रासने विरूद्ध रविंद्र धंगेकर अशी होणार आहे.
काल देवेंद्र फडणवीस यांनी इच्छुक म्हणून असलेले शैलेश टिळक यांची पुण्यातील टिळकांच्या निवासस्थानी भेट घेतली. रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि शैलेश टिळक यांच्यात काही मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली आहे. फडणवीस यांच्या भेटीनंतर टिळक यांची समजूत घातली होती. त्यातच आज भाजपकडून हेमंत रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला आहे. त्यामुळे रासने समर्थकांकडून पुण्यात फटाके वाजवून जोरदार जल्लोष केला आहे.
महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तेब करण्यात आला आहे. त्यानंतर काॅंग्रेसचे पुणे शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज काॅंग्रेसची बैठक पार पडली. बैठकीत रविंद्र धंगेकर यांना विजयी करण्यासाठी सगळी ताकद पणाला लावा, पुण्यातील सगळे जण एकत्रित या. असं आव्हान अरविंद शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे कसब्यात रविंद्र धंगेकर यांना आता राष्ट्रवादी, शिवसेनेचीही ताकद मिळणार असून भाजपला हे आव्हान जास्तच महागत पडणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, सुरूवातीपासून कसबा पेठ पोटनिवडणुकीवर काॅंग्रेसने दावा ठोकला होता. त्यासाठी काॅंग्रेसकडून जोरदार हालचालीही सुरू करण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी रविंद्र धंगेकर यांच्या समर्थकांनी बॅनरबाजीही केली. त्यामुळेच महाविकास आघाडीने कसब्याची जागा काॅंग्रेसला सोडली आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादीला दिली आहे.
Read also
- पोटनिवडणुकांसाठी भाजप अन् आघाडीकडून उमेदवार घोषीत…! आता थेट लढत होणार ?
- जगतापांना मागील वर्षापासून आव्हान देणारे राहुल कलाट्यांनी स्पष्ट केली भूमिका, निवडणुक लढणार, मग ती अपक्ष, की आघाडीकडून?
- “फडणवीस अन् टिळकांची रात्री बंद दाराआड चर्चा, ‘समजूत’ काढली की ‘स्थान’ पक्के केले ?” चर्चांना उधाण
- कसबा पेठ पोटनिवडणुकीकरीता आघाडीचा उमेदवार ठरला…! बापटांना आव्हान देणाऱ्या नेत्याचं नाव निश्चित
- कसबा पेठ निवडणुक भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार