पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीकरीता महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपापले उमेदवार निश्चित केले आहेत. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून उमेदवारीवरून ज्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आता पुर्णविराम बसला असून आता पुढची रणनीती दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सुरू करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकांसाठी येत्या दोन दिवसात अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काॅंग्रेसने अगोदरपासूनच आपला दावा ठोकला होता. त्यामुळे महाविकास आघाडीने कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांना आपली उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले हेमंत रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे कसबा पेठ पोटनिवडणुकीत रविंद्र धनंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात लढत होणार आहे.
दुसरीकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आव्हान देणारे राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. 2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राहुल कलाटे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढली. त्यावेळी त्यांना जगताप यांच्या खालोखाल म्हणजे 63, 489 मतं मिळाली. त्यानंतर 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणुक लढविली असता. राहुल कलाटे यांना 1,12,225 इतंकी मत पडलीत. यावेळेच्या निवडणुकीत राहुल कलाटे यांनी लक्ष्मण जगताप यांना जोरदार टक्कर दिली.
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत राहुल कलाटे विरूद्ध अश्विनी जगताप अशी थेट लढत होणार आहे. सुरूवातीपासून दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. मात्र आता दोन्ही पोटनिवडणुकासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपापले उमेदवार घोषीत केल्याने ही निवडणुक थेट लढतीत होणार आहेत.
Read also
- जगतापांना मागील वर्षापासून आव्हान देणारे राहुल कलाट्यांनी स्पष्ट केली भूमिका, निवडणुक लढणार, मग ती अपक्ष, की आघाडीकडून?
- “फडणवीस अन् टिळकांची रात्री बंद दाराआड चर्चा, ‘समजूत’ काढली की ‘स्थान’ पक्के केले ?” चर्चांना उधाण
- कसबा पेठ पोटनिवडणुकीकरीता आघाडीचा उमेदवार ठरला…! बापटांना आव्हान देणाऱ्या नेत्याचं नाव निश्चित
- कसबा पेठ निवडणुक भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार
- पवार साहेब, उद्धव ठाकरे, पटोले अन् राज ठाकरे तुम्हालाही विनंती करतो की ही निवडणुक बिनविरोध व्हावी..;” बावनकुळे