पुणे : केंद्र सरकारने देशातील प्रमुख मुस्लिम नावं असलेल्या ऐतिहासिक स्थळाचं नाव बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच महाराष्ट्रात देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब, अफजल खानावरून वाद विवाद सुरू आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अफजल खान आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. तुम्ही मुघलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल? असा सवाल आव्हाडांनी केलाय. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार टिका टिप्पणी सुरू झालीय.
कसबा पेठ पोटनिवडणुकीकरीता आघाडीचा उमेदवार ठरला…! बापटांना आव्हान देणाऱ्या नेत्याचं नाव निश्चित
जितेंद्र आव्हाडांनी पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी आव्हाडांवर निशाणा साधला आहे. मुघलप्रेमी असणाऱ्या बोलघेवड्या जितूजींनी पुन्हा एकदा मुघलांवर स्तुती सुमने उधळत छत्रपती शिवाजी राजांबद्दल चुकीचे उद्गार काढलेत. छत्रपती महाराज आहेत, म्हणूनच तुम्ही आम्ही आहोत, हे विसरू नकतो, शेवटी जित्या ची खोड तेच खरं. असं म्हणत रविंद्र चव्हाण यांनी आव्हाडांवर टिका केलीय.
कसबा पेठ निवडणुक भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार
रविंद्र चव्हाण यांच्या टिकेनंतर आव्हाडांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. हे सगळे समजायला अक्कल लागते. औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य चलाखी युद्ध निती कशी समजवणार. जाऊदे तुमचा दोष नाही, हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गॅंगवॉर नाही. झाकली मुठ सव्वालाखाची. असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
हे सगळे समजायला अक्कल लागते .. औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य चलाखी युद्ध नीति कशी समजावणार .. जाऊदे तुमचा दोष नाही. हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गँगवॉर नाही .. झाकली मूठ सव्वालाखाची.. https://t.co/8kUhLwftqz
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2023
Read also
- “गोपीचंद पडळकराचं राजकारण फडणवीसांच्या मेहरबानीपेक्षा भुंकण्यामुळे टिकलंय”
- कसब्यात हेमंत रासने विरूद्ध रविंद्र धंगेकर..! आघाडीने कसब्याची जागा काॅंग्रेसला सोडली
- पोटनिवडणुकांसाठी भाजप अन् आघाडीकडून उमेदवार घोषीत…! आता थेट लढत होणार ?
- जगतापांना मागील वर्षापासून आव्हान देणारे राहुल कलाट्यांनी स्पष्ट केली भूमिका, निवडणुक लढणार, मग ती अपक्ष, की आघाडीकडून?
- “फडणवीस अन् टिळकांची रात्री बंद दाराआड चर्चा, ‘समजूत’ काढली की ‘स्थान’ पक्के केले ?” चर्चांना उधाण