पुणे : चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकाकरीता आज महाविकास आघाडी आणि भाजपकडून उमेदवार घोषीत करण्यात आले. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे. तर कसब्यातून भाजपने हेमंत रासनेंना पंसती दिली आहे. या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्या, यासाठी भाजपने प्रयत्न करत आहे. त्यातच राष्ट्रवादीने चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांना उमेदवारी देऊन मोठी खेळी खेळली आहे.
“फडणवीस अन् टिळकांची रात्री बंद दाराआड चर्चा, ‘समजूत’ काढली की ‘स्थान’ पक्के केले ?” चर्चांना उधाण
आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्या. ह्या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्या. यासाठी भाजपकडून राजकीय पक्षांना पत्रंही पाठवण्यात आलीत. यातच चिंचवडची पोटनिवडणुक सुरूवातीपासूनच चर्चेची ठरलीय. ह्य़ा जागेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेस सुरू होती. मात्र राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राहुल कलाटे यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांना जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपली उमेदवारी दिली आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीकरीता आघाडीचा उमेदवार ठरला…! बापटांना आव्हान देणाऱ्या नेत्याचं नाव निश्चित
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत राहुल कलाटे विरूद्ध अश्विनी जगताप अशी थेट लढत होणार आहे. सुरूवातीपासून दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. मात्र आता दोन्ही पोटनिवडणुकासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपापले उमेदवार घोषीत केल्याने ही निवडणुक थेट लढतीत होणार आहेत.
Read also
- “मुघलप्रेमी, मुंबईचा गॅंगवॉर, जित्या ची खोड,” त्या विधानानंतर आव्हाड अन् रविंद्र चव्हाणांमध्ये जुंपली
- “गोपीचंद पडळकराचं राजकारण फडणवीसांच्या मेहरबानीपेक्षा भुंकण्यामुळे टिकलंय”
- कसब्यात हेमंत रासने विरूद्ध रविंद्र धंगेकर..! आघाडीने कसब्याची जागा काॅंग्रेसला सोडली
- पोटनिवडणुकांसाठी भाजप अन् आघाडीकडून उमेदवार घोषीत…! आता थेट लढत होणार ?
- जगतापांना मागील वर्षापासून आव्हान देणारे राहुल कलाट्यांनी स्पष्ट केली भूमिका, निवडणुक लढणार, मग ती अपक्ष, की आघाडीकडून?