पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा निवडणुकीसाठी पोट निवडणुक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यातच या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेले मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक थोडे नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. तशी त्यांनी खंतही व्यक्त करून दाखवली आहे.
मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर त्यांचं राहिलेलं काम पुर्ण करण्याची इच्छा होती. तशी मागणी मी पक्षांकडे केली होती. मात्र पक्षांनी वेगळाच निर्णय घेतला. त्यांनी मागील वर्षात केलेल्या कामांवर अन्याय झाला आहे. एकदंर एखाद्या लोकप्रतिनीधीचं निधन झाल्यानंतर त्यांच्या घरातच उमेदवारी दिली जातात. परंतु असो पक्षांनी जो काही निर्णय घेतला आहे. तो आम्हाला मान्य आहे. परंतु त्याची खंत थोडी मनामध्ये आहे. असं शैलेश टिळक यांनी म्हटलं आहे.
“फडणवीस अन् टिळकांची रात्री बंद दाराआड चर्चा, ‘समजूत’ काढली की ‘स्थान’ पक्के केले ?” चर्चांना उधाण
काल देवेंद्र फडणवीस यांनी इच्छुक म्हणून असलेले शैलेश टिळक यांची पुण्यातील टिळकांच्या निवासस्थानी भेट घेतली. रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि शैलेश टिळक यांच्यात काही मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली आहे. फडणवीस यांच्या भेटीनंतर टिळक यांची समजूत घातली की, स्थान पक्के केेले? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यावर ते बोलतांना म्हणाले की, काल फडणवीस यांच्यासोबत याबद्दल काहीही चर्चा झाली नाही. पण मुक्ता टिळक गेल्यानंतर त्यांना याठिकाणी यायचं होतं.तसेच पक्ष काही निर्णय घेईल, तो घेईल. असं त्यांनी मला सांगितलं होतं. असं टिळक म्हणाले.
कसबा पेठ पोटनिवडणुकीकरीता आघाडीचा उमेदवार ठरला…! बापटांना आव्हान देणाऱ्या नेत्याचं नाव निश्चित
दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अगोदर भाजपने टिळक कुटुंबीयातील कुणाल टिळक यांना प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुक टिळक कुटुबीयांना उमेदवारी मिळणार नसल्याचीही चर्चा दुसऱ्याबाजूला रंगली होती. त्यामुळेच भाजपने हेमंत रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला आहे.
Read also
- चिंचवडमध्ये राहुल कलाटे विरूद्ध अश्विनी जगताप, बिनविरोध की थेट लढत ? अंतिम निर्णय महत्त्वाचा
- “मुघलप्रेमी, मुंबईचा गॅंगवॉर, जित्या ची खोड,” त्या विधानानंतर आव्हाड अन् रविंद्र चव्हाणांमध्ये जुंपली
- “गोपीचंद पडळकराचं राजकारण फडणवीसांच्या मेहरबानीपेक्षा भुंकण्यामुळे टिकलंय”
- कसब्यात हेमंत रासने विरूद्ध रविंद्र धंगेकर..! आघाडीने कसब्याची जागा काॅंग्रेसला सोडली
- पोटनिवडणुकांसाठी भाजप अन् आघाडीकडून उमेदवार घोषीत…! आता थेट लढत होणार ?