मुंबई : ऐनवेळी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी आघाडीसोबत बंडाळी केल्याने नाशिकच्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मोठा घोळ झाला. सुधीर तांबे यांनी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शिवसेना पुरस्कृत म्हणून महाविकास आघाडीने शुंभागी पाटलांना आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र या पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे विजयी झालेत. अन् शुंभागी पाटलांना पराभव स्विकारावा लागला. यातच आज शुंभागी पाटलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
कसब्यात हेमंत रासने विरूद्ध रविंद्र धंगेकर..! आघाडीने कसब्याची जागा काॅंग्रेसला सोडली
मागेच याबाबत सांगितलं होतं की, येत्या 2 तारखेला मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार. परंतु काल रात्री यायला उशिरा झाल्याने आज प्रवेश केला. त्यांना मी याआधीच शब्द दिला होता. त्यामुळे मी शब्दाची पक्की आहे. तसेच उद्धव ठाकरे माझ्यावर जी जबाबदारी देतील. ती जबाबदारी मी राज्यभर फिरून नक्कीच पार पाडेन, अशं शुंभागी पाटील यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे.
पोटनिवडणुकांसाठी भाजप अन् आघाडीकडून उमेदवार घोषीत…! आता थेट लढत होणार ?
राज्यात शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी, यासाठी मुंबईत आंदोलन सुरू करणार आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची परवानगी घेण्यासाठी जाणार आहे. तसेच नाशिकच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मला खुप मदत केली आहे. आता एक शिवसैनिक म्हणूून संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. असंही त्या म्हणाल्या.
Read also
- आपच्या विविध शाखा अन् जनसंपर्क कार्यालयाचे हरीभाऊ राठोड यांच्या हस्ते उद्घाटन
- “कसब्याच्या उमेदवारीवरून शैलश टिळक भाजपवर नाराज, खंतही व्यक्त करून दाखविली”
- चिंचवडमध्ये राहुल कलाटे विरूद्ध अश्विनी जगताप, बिनविरोध की थेट लढत ? अंतिम निर्णय महत्त्वाचा
- “मुघलप्रेमी, मुंबईचा गॅंगवॉर, जित्या ची खोड,” त्या विधानानंतर आव्हाड अन् रविंद्र चव्हाणांमध्ये जुंपली
- “गोपीचंद पडळकराचं राजकारण फडणवीसांच्या मेहरबानीपेक्षा भुंकण्यामुळे टिकलंय”